होय..! देवेंद्र फडणवीस द्वेषाने भरलेला आणि कुजलेल्या विचारांचा माणूस; शरद पवारांना शुभेच्छा ‘न’ देण्याचं कारण आले समोर…

0

सुसंस्कृतपणा जोपासत महाराष्ट्र राज्य राजकारण करत असल्याचे अनेक दाखले देशभरात अनेकांकडून दिले जातात. मात्र अलिकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचाही दर्जा काही प्रमाणात ढासळल्याचं चित्र पाहायला मिळते. (Maharashtra politics) राजकारणात एकमेकांचे अनेक विरोधक असले तरी, वैयक्तिक द्वेष कोणावर ही धरायचा नसतो, महाराष्ट्राने ही परंपरा काही प्रमाणात जोपासली देखील आहे. मात्र अलीकडे अनेक जण एकमेकांवर खालच्या पातळीचे टीका करताना देखील पाहायला मिळतात.

राजकारणात एकमेकांचे अनेक विरोधक असले तरीही विरोधक आवर्जून वयक्तीक कार्यक्रमांना नेहमी हजेरी लावताना पाहायला मिळते. एवढेच नाही तर आपल्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची देखील विजयानंतर भेट घेऊन, विजयाच्या शुभेच्छा देत अभिनंदन केल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात पाहायला मिळतात. कितीही मोठा विरोधक असला तरी, वाढदिवसाला आवर्जून मोकळ्या मनाने शुभेच्छा दिल्याचे आपण अनेक वेळा पाहतो.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तीन वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांना एकत्र आणत, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. यात सिंहाचा वाटा असणाऱ्या आणि महाराष्ट्राच्याच नाही तर, देशाच्या राजकारणातलं खूप मोठं नाव म्हणजे शरद पवार, यांचा आज वाढदिवस आहे. राजकारणातला वस्ताद म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवारांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. शरद पवार (Sharad Pawar birthday) यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर पाहिलं असेल.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी देखील शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, निरोगी आणि दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली. एकीकडे देशाच्या पंतप्रधान यांनी देखील शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र दुसरीकडे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी शरद पवार यांना अद्याप सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्या नसल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणीस यांनी शरद पवार यांना अद्याप वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्यामुळे, सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस चांगले ट्रोल होताना पाहायला मिळत आहेत. गणेश शिंदे नावाच्या एका यूजर्सने एक ट्विट करत म्हटले आहे, मोठी वाटणारी काही लोकं खूपच खूजी असतात. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, द्वेषाने, आकसाने भरलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांनी पुढील पन्नास वर्षे राजकारण केलं तरी देखील लोक त्यांना कधी लोकनेता म्हणणार नाहीत, असा टोलाही गणेश शिंदे यांनी लगावला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.