मोदींच्या आवडत्या अॅकरने चक्क दारू पिऊन अँकरिंग केली; बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहताना ‘गडी’ काहीही बरळलाय, ऐकून जाल चक्रावून

0

देशातल्या पत्रकारितेची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होताना पाहायला मिळत असतानाच,दोन दिवसापूर्वी पत्रकारितेला काळींबा फासणारी घटना देशाने पाहिली. न्युज नेशनच्या एका सल्लागार संपादक आणि अॅकरने चक्क दारू पिऊन अॅकरिंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे हा नरेंद्र मोदींचा आवडता ‘अँकर’ असल्याने या घटनेची चर्चा जोरदार रंगली असल्याची सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांपासून देशातला पत्रकारितेचा स्तर ढासळल्याचा आरोप सातत्याने होताना पाहायला मिळतो. अनेक स्तरातून मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसून येते. खासकरून हिंदी टीव्ही चॅनल्स नरेंद्र मोदी यांचा अजेंडा चालवत असल्याचा गंभीर आरोप अनेक ज्येष्ठ पत्रकारांकडूनही होताना दिसतो. एवढंच नाही तर काही ठराविक न्यूज चॅनल्सच्या अॅकरशी मोदींचे चांगले संबंध असून, हे सर्व अँकर मोदींचे वारंवार गुणगान गातात असाही आरोप अनेकांकडून केला जातो.

झी न्यूज, आजतक, न्यूज १८, एबीपी न्यूज, अशा मोठ्या न्यूज चॅनलचा यात समावेश असून, या मीडिया हाऊसला गोदी मीडिया म्हणून देखील संबोधल जातं. या माध्यमांच्या अॅकर विषयी बोलायचं झालं तर, यातील बरेचसे अॅकर मोदींचे वेळोवेळी कौतुक करताना पाहायला मिळतात. अंजना ओम कश्यप, सुधीर चौधरी, अमिश देवगन, यांच्यासह अनेकांना टीकेला सामोरं जावं लागतं. हे अॅकर भारतीय जनता पार्टीचा अजंटा चालवतात, असा आरोप यांच्यावर होत असून,हे पत्रकारिता नाही तर चाटूकारिता करतात,असाही आरोप केला जातो.

यामधील बरेचशा अॅकरचे शो वादग्रस्त देखील ठरले आहेत. आॅन कॅमेरा ‘आज तक’ची अॅकर अंजना ओम कश्यपने आदित्य ठाकरे यांच्या विषयी एक वादग्रस्त विधान देखील केले होते. एवढेच नाही तर अंजना ओम कश्यप यांनी आपलं नाव सांगताना ‘अंजना ओम कश्यप’ ऐवजी मोदी म्हटल्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अँकर अमिश देवगन यांच्या एका शोमध्ये काँग्रेसच्या नेत्याने आमिश देवगन यांना ऑन रेकॉर्ड ‘भडवा’ आणि दलाल म्हटल्याचा प्रकार देखील घडला आहे.

आठ तारखेला तामिळनाडूच्या कुन्नर भागात विमानाच्या झालेल्या दुर्घटनेत भारताच्या संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झाला. या विमान दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देशात हादरून गेला. देशभरातून बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लष्करप्रमुख म्हणून जनरल बिपिन रावत हे निवृत्त झाले होते. बिपिन रावत निवृत्त झालेले हे देशातले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते.

एकीकडे संपूर्ण देश त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहत होता, मात्र दुसरीकडे ‘न्यूज नेशन’ टीव्ही चॅनलच्या एका अॅकरने चक्क दारू पिऊन अँकरिंग करत बिपिन रावत हे एक सर्वोत्तम जर्नालिस्ट होते, असं धक्कादायक विधान करताना पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अँकरिंग करत असताना बिपिन रावत यांच्या विषयी आपण काय बोलतोय? याचे भानही या महाशयाला राहिले नाही. श्रद्धांजली वाहताना या बहाद्दराने बिपिन रावत ऐवजी व्हीपी सिंग यांचंच नाव घेतलं.

‘दीपक चौरसिया’ असं या महाशयांचा नाव असून, या बहाद्दराने अनेक वेळा दारू पिऊन अनेक शो केल्याची माहिती आहे. कदाचित यावेळी देखील तो दारू पिला असला तरी व्यवस्थित शो करेल, असं चॅनलच्या प्रमुखांना वाटलं असावं, मात्र घडलं भलतंच. गड्यानं जनरल बिपिन रावत यांचा ‘जर्नालिस्ट’ असा उल्लेख केला. शेवटी श्रद्धांजली वाहताना तर, थेट नावंच बदलून टाकलं. या महाशयाल नीट बोलताही येत नसल्याचं व्हीडिओत दिसून येत आहे. हा व्हिडिओ मोहम्मद झुबेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.