Bipin Rawat Death News: CDS जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, त्यांच्यासह..

0

Bipin Rawat Death News : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat Death News) यांचे व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. जनरल रावत, त्यांच्या पत्नीसह १४ जण भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर आज दुपारी तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात कोसळले.  एमआय सीरीज हेलिकॉप्टरने सुलूर आर्मी बेसवरून उड्डाण केले, काही वेळातच ते निलगिरीमध्ये क्रॅश झाले.  या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातात एक जण गंभीर भाजला आहे. तेथून  पळून जाण्यात ते यशस्वी ठरला आहे. हेलिकॉप्टरमध्ये जनरल रावत यांच्यासह त्यांची पत्नी, त्यांचे संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि भारतीय हवाई दलाचे जवान होते.  भारतीय वायुसेनेने एक ट्विट केले आहे की, “या दुर्घटनेत जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि हेलिकॉप्टरमधील इतर 11 जणांचा मृत्यू झाला आहे, हे अत्यंत दुःखद  आहे.

भारतीय वायुसेनेच्या दुसर्‍या ट्विटमध्ये अशीही माहिती देण्यात आली आहे की, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग सध्या दुखापतीमुळे वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट केले. “तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने देशाचे आणि सशस्त्र दलांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे.

भारतीय हवाई दलाने एक ट्विट करून हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असल्याची माहिती दिली आहे. CDS जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे IAF चे Mi-17V5 हेलिकॉप्टर आज तामिळनाडूतील कुन्नूर जवळ क्रॅश झाले. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सदर अपघाताची पहिली माहिती दुपारी 12.20 मिनिटांनी मिळाली. केटेरी गावातील ग्रामस्थांनी संरक्षण आस्थापनाला याची माहिती दिली त्यांनी जिल्हा प्रशासनाला कळवले.  एमआय सीरीज हेलिकॉप्टरने सुलूर आर्मी बेसवरून उड्डाण केले, काही वेळातच ते तामिळनाडूतील निलगिरीमध्ये क्रॅश झाले.

ते हेलिकॉप्टर वेलिंग्टन डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटकडे निघाले होते. एका टीव्ही चॅनलवरील अपघातस्थळाच्या छायाचित्रांमध्ये हेलिकॉप्टरचा ढिगारा आणि धुराचे लोट झालेले पाहायला मिळत आहे. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे, मात्र जंगल परिसरामुळे त्यात अडचणी येत आहेत.  स्थानिक लोक आणि पोलीस मृतदेह ताब्यात घेत आहेत.

हेही वाचा: आठवतायत का मनसेचे ते 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील 13 आमदार, जाणून घ्या सविस्तर.. 

बाळासाहेबांनी आदेश दिला आणि या नेत्याने भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान धावपट्टी खोदली एवढंच नव्हे तर.. 

पादणं म्हणजे नेमकं असतं तरी काय? त्याला थांबवलं जाऊ शकते का? कशामुळे जास्त वास येतो? 

The story of a helpless woman: जेव्हा एखाद्या स्त्रीला दारुड्या नवऱ्यामुळे एसटीमधून बाहेर काढलं जातं तेव्हा, तिची झालेली केविलवाणी अवस्था..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.