Video: व्हायरल फोटोमधील व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू, आता म्हणतोय गुटखा खात नव्हतो; हर्बल..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना ग्रीन पार्क, कानपूर येथे खेळवण्यात आला. सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर चर्चेत राहिला असला तरी, स्टेडियममध्ये अजून एकजण खूप चर्चेत आहे. हा सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता आता चांगलाच चर्चेत आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो व्यक्ती नेमका कोण? त्याच्या सोबत असणारी मुलगी कोण? चला जाणून घेऊया.
कानपूरमध्ये भारत न्युझीलंड सामना सुरू असताना कॅमेरामनने याच्याकडे कॅमेरा फिरवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताय. लाइव्ह मॅच सुरू असताना तो टीव्हीवर सुध्दा झळकला. मग काही नेटकऱ्यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर ट्विटरवर सुध्दा अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी त्या व्यक्तीचा तो फोटो ट्विट केला.
व्हिडिओमध्ये गुटखा खाणारा व्यक्ती मोबाईलवर बोलत असलेला पाहायला मिळत आहे. स्टेडियममध्ये त्याच्यासोबत एक महिलाही बसलेली पाहायला मिळत आहे. जेव्हा कॅमेरा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला त्यावेळी त्या व्यक्तीला गुटखा खात असताना तोंडसुध्दा पूर्णपाने उघडता येत नव्हते आणि काही लोकांनी त्याने गुटखा खाल्ल्याचे सांगितले. तो व्यक्ती कोण याची ओळख पटली आहे.
स्टेडियममध्ये मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे. गुटखा, पान, सुपारी यांसारख्या वस्तू स्टेडियममध्ये खाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे कानपूर पोलिसांकडून गुटखा खाणारा व्यक्ती कोण याचा शोध सुरू केला होता. त्याचे नाव शोभित पांडे असे आहे. तो एक व्यवसायिक आहे. फोटोमध्ये त्यासोबत दिसत असलेली मुलगी त्याची बहीण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
#Video of man-eating gutkha in stands in Kanpur during the first Test goes viral. #WATCH #INDvNZ #KanpurTest #Kanpur #Gutkha #NZvIND #IndiaVsNewZealand #ShreyasIyer #RavindraJadeja pic.twitter.com/xNt4ihDUPd
— Amazing info hub (@Amazinginfohub1) November 26, 2021
“माझा व्हिडिओ सोशल मीडया व टिव्हीवर व्हायरल झाला होता. त्यामध्ये माझ्यासोबत असलेली मुलगी माझी बहीण आहे. मी गुटखा किंवा पान मसाला खाल्ला नव्हता, ती गोड सुपारी तोंडात होती. त्या ठिकाणी बरेच लोक गुटखा खात होते. तरीदेखील माझ्यावरच कॅमेरा फोकस करण्यात आला. असे शोभित पांडे यांनी स्पष्ट केले आहे. आपण याबाबत नाराज असल्याचे देखील ते म्हणाले.
सविस्तर बातम्या: तुम्ही काय बॉम्ब फोडताय खरा बॉम्ब तर राष्ट्रवादी फोडणार, भाजपातील बरेच जण राष्ट्रवादीच्या संपर्कात
येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकांमध्ये मनसेच्या कामाची पावती लोक देतील, कारण..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम