तुम्ही काय बॉम्ब फोडताय खरा बॉम्ब तर राष्ट्रवादी फोडणार, भाजपातील बरेच जण राष्ट्रवादीच्या संपर्कात

0

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर राज्यात राजकीय क्षेत्रात अनेक फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेची सूत्रे जुळवण्यासाठी बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका देखील येऊन ठेपल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बरेच बदल होणार आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे वाढते प्रस्थ पाहता बऱ्याच नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये यायचं आहे. त्यासाठी बरेच नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटत आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. येणारी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शरद पवार व अजित पवार हे दोन्ही नेते यावर निर्णय घेणार आहेत.

तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका देखील आता जवळ आल्या आहेत. त्यामूळे ग्रामीण भागात सुध्दा बरेच नेते राष्ट्रवादीमध्ये यायला उस्तुक आहेत. परंतु कुणीही या आणि जा असं चालणार नसल्याचं पक्षाने भूमिका घेतली आहे. त्यासाठी पक्ष विचार आणि अभ्यास करणार आहे. अशी माहिती हाती लागली आहे.

निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कुठेही अन्याय अन्याय होता कामा नये अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. 2014 मध्ये राज्यात शिवसेना व भाजपा सत्तेत आली. त्याकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक निष्ठावंत मानले जाणारे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निघून गेले. परंतु त्या काळात देखील बरेच नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ठाम राहिले.

या निष्ठावंत लोकांना कुठेही फटका बसेल असे काहीही पक्ष करणार नसल्याची माहिती मिळत आहे. कारण पक्षाच्या वाईट काळात हीच नेतेमंडळी पक्षासोबत होती. राष्ट्रवादीने ज्यांना भरभरून दिले, ज्यांना मंत्री केले तेच पक्षाला पाठ दाखवून गेले.

भाजपची सत्ता येईल मग आपला फायदा होईल, अशा विचाराने तर बरेच नेते पक्ष सोडून भाजपा मध्ये गेले परंतु तिथेही त्यांना निराशा सहन करावी लागत आहे. 2014 ते 2019 पर्यंत भाजपा सत्तेत होती त्यावेळी हे लोक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते. आणि 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली आणि हे लोक भजपात गेले. तब्बल 10 वर्ष सत्तेपासून त्यांना दूर राहण्याची वेळ आली.

महत्वाच्या बातम्या: संप मागे नाहीच! एसटी चालवायची असेल तर शरद पवारांनी ड्रायव्हर,अनिल परबांनी घंटी वाजवायची,अजित पवारांनी प्रवासी व्हायचं..

२०२४ला शिवसेना भाजप सोबत जाणार असल्याचं स्पष्ट; शरद पवारांची खेळी त्यांच्याच अंगलट 

राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या मावसभावाचा सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपकडून पराभव

कृषी कायदे मागे घ्या,गरीब कल्याण योजनेची मुदत वाढवा,तुम्ही काहीही करा; लोकांनी तुमची उचल बांगडी करायचं ठरवलंय.. 

नवरा तुरुंगात जाईल या भीतीने डोकं झालं आऊट; कोणीही ऐरा-गैरा क्रांती रेडकरला गंडवू लागलाय! प्रकरण वाचून तुम्हीही म्हणाल बाई खरंच वेडी झाली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.