संप मागे नाहीच! एसटी चालवायची असेल तर शरद पवारांनी ड्रायव्हर,अनिल परबांनी घंटी वाजवायची,अजित पवारांनी प्रवासी व्हायचं..

0

जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, या संपामुळे सर्वसामान्यांचे अतोनात हाल होताना पाहायला मिळत आहेत. अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर महा विकास आघाडीचे सरकार तोडगा काढू शकले नाही. काल परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्य सरकारमधील काही महत्त्वाच्या नेत्यांचु चर्चा झाली,यामध्ये काही पक्षाचे नेते देखील उपस्थित होते. या सर्वांची चर्चा झाल्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणाही केली. मात्र एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे, या अटीवर अडून बसलल्याचे पाहायला मिळालं.

गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे या अटीवर ते अडून बसले आहेत. राज्यभर जोरदार आंदोलन करत असून, कुठल्याही परिस्थितीत विलिनीकरण झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र कर्मचारी यांनी केलेल्या विलगीकरण मागणीची तातडीने अंमलबजावणी करणं शक्य नाही. याबाबत न्यायालयाने तीन जणांची समिती नेमली आहे. या समितीला बारा आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यांची समिती जो निर्णय घेईल, ते राज्यशासनाला मान्य असणार असल्याचे, देखील अनिल परब यांनी म्हटलं आहे. तरीदेखील कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, हा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. काल बैठकीनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. नोकरीला लागल्यानंतर दहा वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात पाच हजार रुपयांनी वाढ होणार असल्याचे अनिल परब यांनी जाहीर केलं.

पहिल्या श्रेणीत या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात पाच हजारांनी वाढ केल्यानंतर दुसऱ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात चार हजार रुपयांनी वाढ होणार आहे. त्याचबरोबर वीस वर्षांहून जास्त काळ नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात अडीच हजार रुपये वाढ होणार असल्याचं परब यांनी जाहीर केलं. त्याचबरोबर अनिल परब यांनी घरभाडे हे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच दिलं जातं. या गोष्टीचा विचार करता एसटी कर्मचाऱ्यांना इतिहासात ही मोठी पगारवाढ असल्याचं स्पष्ट केलं.

परभणी एसटी कर्मचाऱ्यांसाठी या सगळ्या मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी कर्मचारी मात्र राज्य शासनामध्ये महामंडळाचा विलीनीकरण व्हायलाच पाहिजे, या मागणीवर ठाम असून, अद्याप एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनीही एसटी कर्मचाऱ्यांना समोर भाषण करत बरोबर आहे. एसटी महामंडळाचा राज्य शासनामध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नसल्याचे स्पष्ट केले.

गुणरत्न सदावर्ते यांनी कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे देखील स्पष्ट केलं. जर एसटी सुरू करायची असेल तर, शरद पवार यांनी ती चालवायची, अनिल परब आणि घंटा वाजवायची, आणि अजित पवार यांनी त्याचा प्रवासी म्हणून प्रवास करायचा. असाही टोला महाविकास आघाडी सरकारच्या नेत्याला सदावर्ते यांनी लगावला. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा समोर केलेल्या आक्रमक भाषणावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी या भाषणावर सडकून टीका देखील केली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.