राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या मावसभावाचा सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपकडून पराभव

0

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकत भाजपला धूळ चारली आहे. भाजपला फक्त ४ जागांवर विजय मिळवता आला आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी वाटत असताना शिवसेनेला बोनस दोन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संख्यात्मक ताकद कमी झाली आहे.

जिल्हा बँकेच्या कारभारावर इथून पुढे कोणाचे वर्चस्व चालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्याचे मंत्री जयंत पाटील यांचाच शब्द अंतिम राहणार की मागील वेळेप्रमाणे होणार? हा देखील प्रश्न सांगलीच्या जनतेला पडला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करूया असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणणे होते. त्याला सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील सहमती दर्शविली होती.

परंतु, काँग्रेसचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी मात्र बिनविरोध निवडणूक करण्यास नकार दिला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून पॅनेल करून निवडणूक लढवली तरच आम्ही तुमच्यासोबत निवडणूक लढू. जर सर्वपक्षीय पॅनल केला तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशी भूमिका डॉ. विश्वजीत कदम यांनी घेतली.

त्यामुळे बिनविरोध निवडणूक लढण्याचा मार्ग बंद झाला. जिल्हा बँकेच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला अकरा, काँग्रेसला सात आणि शिवसेनेच्या वाट्याला तीन जागा मिळाल्या. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रत्येक घटक पक्षाची एक जागा अशा तीन जागा बिनविरोध निवडून आल्या. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आघाडीचेच वर्चस्व राहणार हे स्पष्ट झाले होते.

जिल्हा बँक निवडणुकीत आ. मानसिंगराव नाईक, आ. अनिल बाबर आणि महेंद्र लाड या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या. भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेलच्या नेत्यांनी अधिक ताकदीने ही निवडणूक लढवली. भाजपने देखील या निवडणुकीत चांगलीच कंबर कसल्याचे पाहायला मिळाले. भाजपप्रणीत पॅनलला चार जागा मिळाल्या.

जतच्या जागेवर महाविकास आघाडीचा पराभव झाला. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचा पराभव डॉ. विश्वजीत कदम यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. विक्रम सावंत विश्वजीत कदम यांचे मावसभाऊ आहेत. पाठीमागच्या वेळी निवडणुकीमध्ये आ. विक्रम सावंत यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र विद्यमान सभापती मनोज जगताप यांचा दारुण पराभव केला होता. त्याच्याच वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले प्रकाश जमदाडे यांना जगतापांनी तिकिट दिले आणि त्यांना निवडून आणले.

महत्वाच्या बातम्या: मनसेला मोठा धक्का, राज्य उपाध्यक्ष रुपाली पाटील यांनीच केले पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप 

नवरा तुरुंगात जाईल या भीतीने डोकं झालं आऊट; कोणीही ऐरा-गैरा क्रांती रेडकरला गंडवू लागलाय! प्रकरण वाचून तुम्हीही म्हणाल बाई खरंच वेडी झाली.. 

Petrol Price Today: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, इंधन दरात मोठी घट, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण 

Ajit Pawar: नगरकरांनी थेट पालकमंत्रीच बदलून टाकला; नगरकरांच्या या कृत्यामुळे अजित पवारांनी डोकंच बडवून घेतलं 

मोदींचा बुरखा फाटला टराटरा; शेतकऱ्यांसाठी कृषी कायदे मागे घेतलेच नाहीत! धक्कादायक बाब आली समोर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.