मनसेला मोठा धक्का, राज्य उपाध्यक्ष रुपाली पाटील यांनीच केले पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप

0

पुणे प्रतिनिधी,
पाठीमागील काही दिवसांपासून मनसेच्या पुण्यातील धडाडीच्या नेत्या मनसेला रामराम करून इतर पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्याचे पाहिला मिळत आहे. नुकतेच त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले असल्याचं बोललं जातंय. याबाबत त्यांनी अजूनतरी स्वतः कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केले नसले तरी, मी कोणत्याही पक्षात जाऊ शकते असं बोलल्याने आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे.

रुपाली ताई ठोंबरे यांनी स्वतःच त्यांच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नुकतेच रुपाली पाटील ठोंबरे यांनी समीर वानखेडे यांना उद्देशून एक पोस्ट शेअर केली होती. यामुळे सुध्दा रुपाली पाटील यांना टार्गेट केले जात होते. याबाबतीत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, मी शेअर केलेली पोस्ट एक वकील म्हणून शेअर केली होती. ते माझे वयक्तिक मत होते.

याबाबत मी कुठल्याही मिडीयाला माहिती दिली नव्हती, असे देखील त्यांनी म्हटले आहे. मी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पुण्यातील कामांसाठी भेटले, मी मनसे सोडणार नाही. परंतु पक्षातील लोकांनी जर मला त्रास दिला तर, मला पक्ष सोडावा लागेल. असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. परंतु येणाऱ्या काळात कुठल्या पक्षात जाणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

मी कोणत्याही पक्षात जाईल असे रुपाली पाटील म्हणाल्या आहेत. पक्षाने माझे आमदारकीचे तिकीट कापले तरीसुध्दा मी मनसे पक्ष सोडला नाही. आमच्या पक्षातील लोकांनीच माझ्यासोबत राजकारण केले. त्यांचे सर्व रेकॉर्ड माझ्याजवळ असल्याचे देखील त्या म्हणाल्या. रुपालीला थांबवायचे कसे? यासाठी काही लोक वारंवार प्रयत्न करत आहेत. मात्र मी मर्दानी स्त्री आहे,मी सहन करणार नाही, अशा शब्दांत रुपाली पाटील यांनी पक्षातील लोकांचा समाचार घेतला.

पक्षामध्ये काहीही काम न करणारी रिकामटेकडी नेते मंडळी आहेत. या लोकांबद्दल मी स्वतः राज ठाकरे यांच्यांशी बोलणार आहे. जाणूनबुजून माझ्याविरुद्ध जे लोक षडयंत्र रचत आहेत, आमच्याच मनसेवाल्यांना वाटत आहे, की मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जावे. भाजपमध्ये येण्यासाठी मला ऑफर होती. असा खुलासा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.

मी गेल्या 14 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करत आहे. मी राज ठाकरे यांच्याकडे बघून काम करते. येणाऱ्या काळात जर मला असाच त्रास दिला तर, मला पक्षातील लोक पर्याय शोधायला लावतील, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याबाबत वक्तव्य केले आहे.

 

महत्वाच्या बातम्या: नवरा तुरुंगात जाईल या भीतीने डोकं झालं आऊट; कोणीही ऐरा-गैरा क्रांती रेडकरला गंडवू लागलाय! प्रकरण वाचून तुम्हीही म्हणाल बाई खरंच वेडी झाली.. 

Petrol Price Today: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, इंधन दरात मोठी घट, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण 

Ajit Pawar: नगरकरांनी थेट पालकमंत्रीच बदलून टाकला; नगरकरांच्या या कृत्यामुळे अजित पवारांनी डोकंच बडवून घेतलं 

मोठी बातमी! पाकिस्तानातील मुलींची चिनी पुरुष करत आहेत खरेदी आणि पुढे असे होत आहे, वाचून बसेल धक्का 

या कारणामुळे मध्य प्रदेशात एकाने आपल्या पत्नीसाठी बांधला ताजमहल, फोटो पाहून वेडे व्हाल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.