“दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये”, शेतकरी राजा तू प्रत्येकाचा बाप आहेस, तू आहे म्हणून दुनिया आहे; अखेर तिनही कृषी कायदे रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा नुकतीच केली आहे. नरेंद मोदींनी आता या तीनही कृषीविषयक कायद्यांविरोधात आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना आता आपल्या घरी जाण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे रद्द करण्यासाठी बऱ्याच शेतकरी संघटनांचे बऱ्याच महिन्यांपासून दिल्ली येथे आंदोलन सुरू होते. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर बऱ्याचदा दवाब टाकून सुध्दा शेतकरी आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते.
आज गुरु नानक देवजींच्या प्रकाशाचा पवित्र सण आहे. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे हे सांगायला मी आलो आहे असे देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले. मी आंदोलक शेतकऱ्यांना आपापल्या घरी जाण्याचे आवाहन करतो असे देखील नरेंद्र मोदींनी म्हणाले आहेत.
आम्ही बरेच प्रयत्न करूनसुध्दा काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्यांमधील एक वर्ग या कायद्यांना विरोध करत होता, परंतु आमच्यासाठी तो खूप महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनासुध्दा सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही शेतकऱ्यांना शेवटपर्यंत समजावले आहे. आम्ही शेतकऱ्यांचे प्रत्येकदा म्हणणे ऐकून घेतले आहे त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“आमचे सरकार शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी, खासकरून लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशातील शेतीच्या हितासाठी, भारताचे हित करण्यासाठी, ग्रामीण भागातील गरिब जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी, अगदी प्रामाणिकपणे, समर्पणाच्या भावनेने, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा कायदा चांगल्या हेतूने आणला आहे. असे नरेंद्र मोदी म्हणाले.
“ आम्ही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधार करण्यासाठी तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळावी यासाठी आम्ही हे केले. वर्षानुवर्षे अशी मागणी होत होती. याअगोदर अनेक सरकारांनी यावर चर्चा विनिमय केले होते. यावेळी सुध्दा चर्चा व विचारमंथन झाले होते. देशाच्या विविध भागातील बऱ्याच शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला,” असेदेखील मोदी म्हणाले.
“आज मी तुम्हा सर्वांना सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आज गुरुनानकजी यांची जयंती आहे. मी आंदोलांकर्त्या शेतकरी वर्गाला पुन्हा आपापल्या घरी जाण्याचे आवाहन करतो. या महिनाअखेरीस संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे, संसदेमध्ये हे तिनही कृषी कायदे मागे घेणार आहोत,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
झीरो बजेट शेतीला प्रोत्साहन देणार:
“आम्ही शेतीशी संबंधित आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. झिरो बजेट शेतीला म्हणजेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करून शेती करणे. एमएसपी प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी, भविष्य काळातील गरजांचा विचार करून अशा कृषी विषयक बाबींसाठी निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करणार आहोत. या समितीत केंद्र सरकार, राज्य सरकार, शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ यांचे प्रतिनिधी असणारा आहे,” अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.
राकेश टिकैत यांनी घेतली “ही” भूमिका:
राकेश टिकैत यांनी एक ट्विट करून मोदी सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी आंदोलन लगेच मागे घेतलं जाणार नाही असं राकेश टिकैत म्हणाले आहेत. “आंदोलन लगेच मागे घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट बघू ज्या दिवशी कृषी कायदे संसदेमध्ये रद्द केले जातील. सरकार एमएसपीबरोबरच शेतकऱ्यांच्या दुसऱ्या मुद्द्यांवर सुध्दा चर्चा केली पाहिजे, (नाहीतर तोपर्यंत आम्ही वाट पाहू)”, असं ट्विट राकेश टिकैत यांनी केले आहे.
हेही वाचा: शौचालयासाठी मोदींनी कोट्यवधी पैसे खर्च केले; पण कंगणाला उघड्यावर बसू नये हे का सांगितले नाही
राज्यात ग्रामपंचायत पोटनिवडणूकीचे बिगुल वाजले; नागरिकांना सत्ता बदलण्याची सुवर्णसंधी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम