Amravati violence: पैसे आणि दारु पाजत भाजपनेच अमरावतीत हिंसाचार घडवून आणला; पोलीस तपासात सत्य आले समोर

0

त्रिपुरामध्ये अल्पसंख्यांकावर झालेल्या अत्याचाराचे पडसात महाराष्ट्रात उमटल्याचे पाहिला मिळाले. काही मुस्लिम संघटनांनी त्रिपुरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून १२ तारखेला अमरावतीमध्ये निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा काढताना, त्यानी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनही दिले, मात्र घरी जाताना काही ठिकाणी त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली,आणि हिसाचार झाला. या घटनेला सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी एकमेकांना जबाबदार धरत आरोप प्रत्यारोप केले. मात्र नवाब मलिक यांनी काही धक्कादायक खुलासे केले असून, पुन्हा एकदा भाजप अडचणीत आले आहे.

संजय राऊत यांनी तर थेट या हिंसाचारामागे भाजप असल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर त्यांनी, नुकत्याच झालेल्या १३ राज्यातल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यामुळेच, त्यांनी हिंदू-मुस्लिम समाजात हिंसाचार, जाती-जातीत तेढ निर्माण करणारी त्यांची जुनी हत्यारे, बाहेर काढली असल्याचा, गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. आणि एकच खळबळ उडाली. संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता नवाब मलिकांनीही अमरावतीत घडलेल्या हिंसाचार घडवण्यासाठी भाजपने पैसे पुरवले असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आर्यर खान ड्रग्स प्रकरणापासून नवाब मलिक हे नाव महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गाजलं. आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील अनेक आरोप करत खळबळ उडवून दिली होती. आता नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत, त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे राज्यात पडसाद उमटले, मात्र हा हिंसाचार जाणून बुजून भाजपने घडवून आणला, असल्याचं सांगत, या प्रकरणावत नविन धक्कादायक खुलासे करत, पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

अमरावतीत घडलेल्या हिंसाचारात भाजपचा हात असल्याचा धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी केला. मुस्लिम संघटनांनी काढलेल्या मोर्चानंतर भाजपने देखील अमरावती बंदचे आवाहन केले, मात्र बंदच्या आडून भाजपाने हिंसाचार घडल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. बंदचे आयोजन करून भाजपने हिंसाचार व्हावा यासाठी पैसे पुरवले,दारू वाटली, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली, असल्याचा धक्कादायक खुलासा नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केल्याने, एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात दंगल व्हावी, यासाठी भाजपने पुरेपूर प्रयत्न केले, मात्र पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळत, त्यांचा हा मनसुबा उधळून लावला. आणि पोलीसांच्या सतर्कतेमुळे अमरावतीत कोणत्याही दोन समाजात वाद झाले नाहीत असंही नवाब मलीक यांनी पत्रकार परिषदेत म्हंटलं. अमरावती झालेल्या हिंसाचाराचे नियोजन दोन तारखेला भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी रचला असल्याचा धक्कादायक खुलासा देखील नवाब मलिक यांनी केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.