काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच मित्रपक्षाने घेतली आहे, या नेत्याने केला हा गंभीर आरोप
महाविकास आघाडी सरकारमधील अंदर्गत वाद बऱ्याचदा चव्हाट्यावर आलेलं आपल्याला पाहायला मिळाले. परंतु तरीसुध्दा महाविकास आघाडीत सगळं काही व्यवस्थित चालू असल्याच त्यांचे नेते सांगत असतात. परंतु महाविकास आघाडीतील काही नेतेमंडळी एकमेकांवर आरोप, कुरघोड्या करताना पाहायला मिळत आहेत. स्थानिक पातळीवरील नेतेमंडळी आपला स्पर्धक म्हणून एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत.
मध्यंतरी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे व शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील असतील यांच्यातील वाद असेल किंवा मग नागपूरच्या काँग्रेस नेत्याने भाजपाच्या उमेदवाराला मतदान करा असे केलेलं आव्हान असेल. यामधून महविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षश्रेष्ठी कितीही सगळं व्यवस्थित आहे असं सांगत असले तरीदेखील अंतर्गत वादविवाद चव्हाट्यावर येत आहेत.
आर्यन खान प्रकरणावरून सुरु झालेल्या ते देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत गेलेल्या ड्रग्स प्रकरणात भाजपा व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या वादात काँग्रेस मात्र तोंडावर बोट ठेऊन आहे. नवाब मलिक व शिवसेना हे दोन्ही पक्ष मात्र आर्यन खान प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता एक विधान केले आहे.
कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी आमच्याच सहकारी मित्रपक्षाने घेतली आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महाविकास आघाडीती धूसफूस आता चव्हाट्यावर आली असल्याचं पाहायला मिळत आहे.
ज्या लोकांनी ही व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. आमच्यावर ईडी लागत आहे. म्हणून कॉंग्रेसला बदनाम करणारी लोक आमच्याच मित्रपक्षात आहेत, असे खळबळजनक विधान आपल्याच महाविकास आघाडीतील मित्रपक्षांबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे. त्यामुळे आता महविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु यामध्ये शिवसेना की राष्ट्रवादी या दोन्ही पैकी कुठला पक्ष आहे हे मात्र अस्पष्ट आहे. त्यामुळे आता शिवसेना व राष्ट्रवादी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रया देतात हे पाहणं ऑस्तुक्याचे ठरणार आहे.
नाना पटोलेंनी हे सर्व सांगताना ‘मित्रपक्ष’ असा उल्लेख केला, पण राष्ट्रवादी कॉंग्रेस की शिवसेना, हे मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. त्यामुळे कॉंग्रेसला बदनाम करण्याची सुपारी नेमकी कोणी घेतली?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
धक्कादायक: महाराष्ट्रातील दंगल व हिंसाचारामागे भाजपचाच हात, रझा अकादमी सोबत असे आहे भाजपचे कनेक्शन
आता तीन दिवस इंटरनेट सेवा बंद, सर्वसामान्य लोकांना देखील बसणार फटका
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम