Virat Kohli: टी-ट्वेंटी,वनडेनंतर आता कसोटी संघाच्या कर्णधार पदावरूनही विराट कोहलीची उचलबांगडी; रोहित कसोटीचाही कर्णधार

0

१७ नोव्हेंबर पासून न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा झाली. या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवड समितीने सोळा खेळाडूंची निवड केली असून, यात तब्बल पाच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही महत्त्वाच्या खेळाडूंना आराम तर काहींना डच्चू देखील दिला आहे. वर्ल्डकप नंतर टी-20 संघाचा कर्णधार कोण असेल? याविषयी चर्चा रंगली होती. मात्र टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) असेल असं अनेकांचं मत होतं, आणि कालच्या निवडीने यावर शिक्कामोर्तब देखील झाले.

टी-20 संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची(captain) निवड झाली असली तरी, त्याच्याकडे वन-डे आणि टेस्ट संघाची धुरा देखील देण्याची शक्यता आहे. लिमिटेड क्रिकेट फॉरमॅटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार क्रिकेट बोर्डांला आणि निवड समितीला देखील मान्य नसून लिमिटेड क्रिकेटमध्ये एकच कर्णधार असावा यावर यांचे एकमत झाल्याचं समजतं. क्रिकेट बोर्ड आणि निवड समितीची यासंदर्भात दुबईमध्ये मीटिंग देखील झाल्याचे बोललं जातंय.

न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या तीन टी-२० सामन्यांच्या (nzvind) मालिकेसाठी रोहित शर्माची कर्णधारपदी निवड झाली आहे.(rohit Sharma as captain) टी२० कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड होणार होती हे जवळपास सर्वच क्रिकेट चाहत्यांना माहिती होतं. मात्र आता वनडेचा कर्णधार देखील रोहित शर्माच असणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली अनुपस्थित असल्यामुळे पहिल्या कसोटी सामन्याचे कर्णधारपद देखील रोहित शर्माकडे दिलं असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे.

पहिला कसोटी सामना विराट कोहली खेळणार नसल्यामुळे कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा पहिल्या कसोटीचे नेतृत्व करेल. असं अनेकांना वाटत होतं. हा साधा आणि सरळ नियम देखील आहे. मात्र असं न होता, पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आले असून, निवड समितीचा हा निर्णय म्हणजे आगामी काळातले काही संकेत तर नाहीत ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विराट कोहलीमुळे कसोटी क्रिकेटला मोठे महत्त्व प्राप्त झाल्याचे जगात देखील बोललं जातं. शिवाय कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड पाहिला तर, तो सर्वोत्तम कर्णधार म्हणून समोर आला आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याचं कर्णधारपद धोक्यात आहे, असं अजिबात म्हणता येणार नाही. जरी रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्याचे कर्णधारपद भूषवणार असला तरी, किमान कसोटी क्रिकेटमध्ये तरी विराट कोहलीचं कर्णधारपद अबाधित राहील यात अजिबात शंका नाही.

मात्र विराट कोहलीचं टी२० नंतर वनडेचंही कर्णधारपद जाणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. जून 2022 पर्यंत भारताला केवळ तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या वर्षी भारतीय संघाचा एकदिवसीय कार्यक्रम नसल्यामुळे अधिकृतरित्या वनडेचा कर्णधार निवडायची घाई क्रिकेट बोर्ड करणार नसलं तरी देखील, विराट कोहली आगामी काळात फक्त कसोटी संघाचा कर्णधार असेल. हे कोहलीच्या चाहत्यांनी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना देखील मान्य करून पुढे जावे लागणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.