T20 World Cup 2021: सुरूवातीपासूनच ‘हा’ अप्रोच दाखवला असता तर ‘ही’ वेळ आली नसती;अफगाण्यांनो भारताच्या मदतीला धावा रे..

0

T20 World Cup 2021- दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकातला ३७ वा सामना काल भारत आणि स्कॉटलंड यांच्यामध्ये दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. नेहमी टॉस हारणाऱ्या विराट कोहलीला काल तेत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त कॉईनने देखील शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेत विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्यांदा नाणेफेक जिंकली, आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रनरेट सुधारण्यासाठी पहिल्यांदा गोलंदाजी करणं आणि टॉस जिंकणं फार महत्वाचा होतं.

दुबईमध्ये बऱ्यापैकी मैदानावर प्रथम फलंदाजी करणं हे आव्हानात्मक असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. सुरुवातीच्या तीन सामन्यात विराट कोहलीने ‘टॉस’ गमावला, आणि तिन्हीं सामन्यात भारताला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. मात्र आज विराटचा वाढदिवस असल्याने नाणेफेकने देखील विराटच्या बाजूने कौल देत, विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रथम गोलंदाजी आल्याने या संधीचा पुरेपूर फायदा उठवत भारतीय गोलंदाजांनी स्कॉटलंड संघाला ८५ धावांवर गारद केले.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाच्या खेळाडूंचा अप्रोच आणि बॉडी लँग्वेज पाहण्यासारखी होती. सुरुवातीच्या दोन्हीं सामन्यात अवघ्या दोन विकेट्स मिळणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी आज भेदक मारा करत स्कॉटलंड संघाला ८५ धावांवर गुंडाळलं. ८६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय सलामीवीरांचा अप्रोच कमालीचा होता. पहिल्याच षटकापासून भारतीय फलंदाजांनी स्कॉटलांडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. स्कॉटलंडच्या एकाही गोलंदाजाला भारतीय सलामीवीरांनी लय पकडू दिली नाही.

सलामीवीर के एल राहुलने सतरा चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत,या विश्वचषकातली सगळ्यात फास्टेस्ट फिफ्टी आपल्या नावावर केली. त्याचबरोबर भारताकडून सर्वात जलद अर्धशतकाच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला. यापूर्वी कम बॅक बॉय युवराज सिंगने २००७ च्या विश्वचषकात बारा चेंडूत अर्धशतक झळकावले होते. ८६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय फलंदाजांनी हे आव्हान अवघ्या ३९ सहज चेंडूत पूर्ण केले. आणि स्ट्राइक रेट च्या बाबतीत सगळ्यांना मागे टाकले.

हेही वाचा-T20 World Cup: आम्ही असंच खेळत राहिलो तर कोणाचा बापही आम्हाला पराभूत करू शकत नाही; विराट कोहलीचा हा सहकारी कडाडला

भारतीय संघाने स्ट्राईक रेटच्या बाबतीत आज सगळ्यांना मागे टाकले असले तरी, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना न्यूझीलंड आणि अफगाणिस्थानच्या सामन्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. जर अफगाणिस्थान संघाने न्यूझीलंड संघाचा पराभव केला तरच भारत सेमीफायनलमध्ये पोहचेल. मात्र ही शक्यता फार कमी वाटते. परंतु जर भारतीय संघाने पहिल्या सामन्यापासून आज ज्या पद्धतीने खेळ केला, जो अप्रोच पाहायला तो पहिल्या सामन्यापासूनच पाहिला मिळाला असता तर, कदाचित आज इतर संघांवर अवलंबून राहण्याची वेळ आली नसती.

भारतीय संघाकडे जगातील सर्वोत्तम फलंदाजी आहे, यात तिळमात्र शंका नाही. भारतीय संघासारखी अनुभवी आणि टॅलेंटेड फलंदाजी इतर कोणत्याही संघाकडे नाही. मात्र फलंदाजांनी दाखवलेल्या अप्रोचमुळे भारतीय संघावर आज साखळीमधेच गारद होण्याची नामुष्की ओढवली आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात विजयी संघ चांगला खेळला, हे जरी खरं असलं तरी, त्या दोन्हीं सामन्यात भारतीय संघाची बॉडी लँग्वेज अप्रोच जिंकण्यासाठी खेळतोय असं वाटत नव्हतं. सर्वोत्तम सलामीवीर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या रोहित शर्माला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात सलामीला पाठवले नाही, फलंदाजीचे क्रम वेड्यासारखे बदलले. यावरूनच न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला मानसिक दृष्ट्या किती खचला होता हे दिसून येतं.

आता संपूर्ण जगाचे खासकरून भारतीय क्रिकेट (indian cricket) चाहत्यांचे लक्ष अफगाणिस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याकडे लागले आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यापेक्षा भारतीय संघाचे अधिक चांगले झाले असल्यामुळे सेमी फायनलमध्ये (semi final) पोहोचण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत, मात्र त्यासाठी उद्या होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडला अफगाणिस्तान संघाकडून पराभूत व्हावे लागेल. जर न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तान कडून पराभूत झाला तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल. मात्र न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्थान कडून पराभूत होईल याची शक्यता फार कमी आहे.

हेही वाचा:Sameer wankhede: चोराच्या उलट्या बोंबा! समीर वानखेडे यांच्या धक्कादायक विधानानंतर नवाब मलिक यांनी केली चिरफाड

Sameer wankhede: समीर वानखेडेंचा वाईट काळ सुरू; आर्यन खान ड्रग्स प्रकरणासह महत्वपूर्ण सहा चौकशातून हकालपट्टी 

Video: अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले नाही तर तुम्ही काय कराल?,जडेजा गेला चक्रावून दिले उत्तर 

T20 World Cup: आम्ही असंच खेळत राहिलो तर कोणाचा बापही आम्हाला पराभूत करू शकत नाही; विराट कोहलीचा हा सहकारी कडाडला

Sameer wankhede: चोराच्या उलट्या बोंबा! समीर वानखेडे यांच्या धक्कादायक विधानानंतर नवाब मलिक यांनी केली चिरफाड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.