या फोटोची कहाणी वाचल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, सर्वांनी एकदा वाचा म्हणजे आपल्याला आपल्या माणसाची किंमत कळेल

0

काजल पाटील, पुणे प्रतिनिधी
आयुष्य जगत असताना  प्रत्येक क्षणाचा आनंद घेवुन खळखळून जगा. सर्वांशी प्रेमाने वागा.आपल्या प्रियजनावर प्रेम करायला विसरू नका. कारण आता वेळ अशी  झालीय कधी कोणासोबत काय होईल हे सांगता येत नाही.आज आपल्या समोर असलेली व्यक्ती उद्या या दुनियेत असेल का? याचा देखील भरोसा आता राहिलेला नाही. आजकाल वेळच अशा घटनाच पाहायला मिळत आहेत.

तुम्ही हा फोटो पाहिल्यानंतर  तुमच्या लक्षात आलेच असेल हा फोटो काय दर्शवत आहे. आजकाल फोटोशूट फार ट्रेंडिग आणि डिमांडिग झाले आहे. काहीजण आठवणी तर काहीजण फॅशन साठी फोटोशूट करतात. आज काढेलेले फोटो उद्या फक्त आठवणच बनुन राहतात. अशीच एक दुःखदायक कहानी एका जोडप्याची आहे. ते दोघे आई बाबा होणार होते , या जगात लवकरच नवीन पाऊल टाकणाऱ्या पाहुण्याचे स्वागत आणि गोड आठवणी म्हणुन त्या  दोघांनी डिलीव्हरी अगोदर फोटो काढले. त्यांनतर जे घडेल ते फार भयानक होत.

  कारच्या अपघातामध्ये ती महिला फार गंभीर जखमी झाली . त्यांनतर या महिलेला तात्काळ दावाखण्यात हलवण्यात आले. डॉक्टरांनी खूप प्रयत्न करत महिलेची डिलिव्हरी केली. व त्यांच्या मुलीचे प्राण वाचवून तिला जीवनदान दिले. परंतु दुर्देवाने महिलेचा मृत्यू झाला. मुलीचा जन्म झाला आणि आई हे जग सोडून गेली. खुप दुःख दायक अशी घटना घडली.

तिच्या पतीला आता आई आणि वडील अशी दोन्ही पात्रे त्यांच्या मुलीच्या आयुष्यात एकट्याने निभवायला लागणार आहेत. मुलीच्या पाहिल्या वाढदिवसाला, मुलगी जेव्हा आईच्या पोटत होती तेंव्हा ज्या ठिकाणी काढलेला आईचा फोटो, त्याच ठिकाणी एका वर्षानंतर मुलीच्या वाढदिवसाला तो आईचा फोटो ठेवून फॅमिली फोटो पुर्ण करण्याचा प्रयत्न त्या मुलीच्या वडिलांनी केला आहे. तेथें आईची कमतरता पुर्ण करण्याचा वडिलांनी केलेला प्रयत्न दिसत आहे.

म्हणतात ना आई विना घर आणि वडीलांशिवाय आयुष्य रिकाम वाटत. तसच काही येथे पहायला मिळाल आहे. आयुष्य जगत असताना आई आणि वडील दोघांचे असणेच फार गरजेचे असते. परंतु काहींच्या आयुष्यात हे सुख मिळत नाही. ज्यांना आईवडील असतात त्यांना त्याची किंमत कळत नाही आणि ज्यांच्याकडे नसतात त्यांना आयुष्यभर त्या गोष्टीची खंत राहते. हा लेख लिहिताना देखील अक्षरशः डोळ्यातून अश्रू येत होते.

खरंच माणसांची कदर करायला शिका, जेव्हा आपली माणसं आपल्यात नसतात तेव्हा जे दुःख सहन करावं लागतं ते खूप मोठं आहे. या धावपळीच्या जीवनात सर्वांना घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालत राहावं लागत. परंतु त्यातूनही आपल्या कुटुंबासाठी वेळ काढा, जगण्याचा आनंद घ्या. दुसऱ्यांना देखील आनंद द्या. आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा व आम्हाला तुमच्यासाठी असंच लिहिण्यास प्रोत्साहन द्या.

असेच खास लेख व्हॉट्सॲपवर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन व्हॉटसॲप ग्रुप जॉईन करा.

हेही वाचा: टाटा समूहाचा इतिहास आणि भारताच्या विकासात असणारे त्याचे योगदान वाचून,तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल

एकीकडे पाकिस्तानीने विजयाची हॅटट्रिक केली,तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या फॅन्सनी पाकिस्तानच्या फॅन्सची धुलाई केली! व्हिडिओ व्हायरल 

विश्वास नांगरे पाटीलांनी तपास पथक तयार करताच समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अटकेच्या भितीने वानखेडे हादरले 

Video: मोदींना मत दें आणि घे शेकूण ऊभ्यानं! भर ना कचं कचं अच्छे दिन होय अच्छे दिन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.