Video: मोदींना मत दें आणि घे ‘शेकूण’ ऊभ्यानं! भर ना कचं कचं…अच्छे दिन होय अच्छे दिन

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या असतानाच अजून देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत रोज होत असणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे, पाहायला मिळत आहे. विरोधक पेट्रोल डिझेल दरवाढीवरून सरकारवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळतात. मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमती काही कमी झाल्याचा दिसून येत नाहीत.

वर्ध्याचे नितेश कराळे मास्तर, आपल्या युट्यूब, फेसबुक चॅनलवरून देशाच्या परिस्थितीवर निर्भीडपणे बोलताना आपण अनेकदा ऐकलं असेल. महागाई,बेरोजगारी, केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, याविषयाची माहीती ते आपल्या चैनल वरून विद्यार्थ्यांसमोर मांडत असतात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी पुढे असणारे नितीश कराळे आपल्या एका विशिष्ट शैलीनेमुळे देखील परिचित आहेत. खद खद मास्तर म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. कोणताही विषय शिकवण्याची त्यांची एक आगळीवेगळी शैली अनेकांना भुरळ पाडून जाते.

नितेश कराळे मास्तर, यांची सरकारवर टीका करण्याची देखील एक आगळीवेगळी शैली आहे. या शैलीचं देखील अनेकदा कौतुक होताना पाहायला मिळतं. आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावरून झालेल्या गोंधळामुळे देखील त्यांनी राजेश टोपे आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावरून झालेल्या गोंधळामुळे त्यांनी राजेश टोपे यांची थेट आरतीची उतरली होती. त्यांच्या आरतीची महाराष्ट्रभर चर्चाही पाहायला मिळालं होतं.

वर्ध्यामध्ये नितीन गडकरी यांची एक सभा होती. ही सभा झाल्यानंतर नितेश कराळे यांनी शेतकऱ्यांचा प्रश्नाविषयी एक निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नितीन गडकरी यांनी, मी काय ‘पब्लीक प्रॉपर्टी’ वाटलो काय? असा सवाल उपस्थित केला होता. मला घरी येऊन भेटा,असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी म्हणाले होते. हा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता.

आता पुन्हा एकदा नितेश कराळे चांगलेच चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या त्यांचा एक पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भातला, पेट्रोल भरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून त्यांनी मोदींवर पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जोरदार हल्ला चढवला आहे, मात्र हा व्हिडिओ खूपच गमतीशीर आहे, एकदा ऐकून पोट भरतच नाही. हा व्हिडिओ पाहण्याची पुन्हा पुन्हा इच्छा होते.

पेट्रोल डिझेल दरवाढी वरुन बनवलेला गमतीशीर व्हिडिओ, त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे, दे ना मोदीला मत आणि घे उभ्याने शिकून.. मरेपर्यंत.. अच्छे दिन होय अच्छे दिन..असे बोल असणारा व्हिडिओ शोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केले जातंय.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.