राहुल गांधी भ्रमात आहेत, पुढील अनेक दशके भाजपचीच सत्ता; प्रशांत किशोर यांचे मोठं विधान

0

निवडणूक रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर  यांनी  आता मोठं विधान केलं आहे.  त्यांनी भाजपा आणि मोदी यांच्याबद्दल एक महत्त्वाचं विधान केलेल आहे.  पुढील अनेक दशके भारतीय राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहणार असल्याचे वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केले आहे. नरेंद्र मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी  यांची चूक असल्याचे देखील प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

 काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशात मोदीलाट असेपर्यंतच भाजप (BJP) सत्तेत राहील या भ्रमात आहेत. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या प्रचंड  किमती वाढवल्या आहेत आणि तरीदेखील मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक पाहायला मिळत नाही. असे देखील प्रशांत किशोर म्हणाले. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने वेळीच नरेंद्र मोदींची ताकद समजून घेणे गरजेचे आहे. अजून काही दशके भारतीय राजकारणात भाजपचं स्थान मजबूत राहील.

काँग्रेस काही मुद्द्यांच्या आधारे नरेंद्र मोदींना सत्तेतून बाहेर काढू शकते, असं मानणं एकदम चूक असल्याचे सांगत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोदींना हरवणे एवढं सोपं नसल्याचा इशाराच दिला आहे. पुढील बरीच वर्षे काँग्रेस पक्ष आणि विरोधकांना भाजप व नरेंद्र मोदींविरोधात मोठा लढा द्यावा लागणार आहे असं ते म्हणाले. प्रशांत किशोर सध्या गोव्यात तृणमूल काँग्रेस पक्षासाठी काम करत आहेत. त्यांनी आता नरेंद्र मोदी यांना सत्तेतून बाहेर ठेवणं एवढं सोपं नसल्याचे सांगत काँग्रेस व विरोधकांना इशारा दिला आहे.

पुढे बोलत असताना प्रशांत किशोर म्हणाले, भाजप कुठेही जाणार नाही. भाजपा सत्तेत असेल किंवा नसेल परंतु काँग्रेसच्या 40 वर्षांच्या राजकारणाप्रमाणेच भाजपा देखील भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी पाहायला मिळतील. तुम्हाला जर देशात30 टक्के मते मिळाली की तुम्ही सहजासहजी जाणार नाही. देशातील जनता संतप्त होऊन नरेंद्र मोदींचा पराभव करतील या भ्रमात राहू नका. जनता कदाचित मोदींना हटवेलसुध्दा परंतु  भाजप कुठंही जाणार नाही. पुढील अनेक दशकं तुम्हाला भाजपसोबत लढावं लागणार आहे, असे वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधीं याच विचारात आहेत की ही फक्त थोड्या वेळेची बाब आहे. त्यांना असे वाटते की, काही जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत. ते होणार नसून जोपर्यंत तुम्ही नरेंद्र मोदींची ताकत समजून घेत नाही आणि त्यांची ताकत स्वीकारणार नाही. तोपर्यंत तुम्हाला मोदींचा व भाजपचा त्यांचा सामना करू करणे शक्य नाही. असे प्रशांत किशोर म्हणाले. जोपर्यंत लोक मोदींची शक्ती समजून घेण्यास जास्त वेळ देत नाहीत, जोपर्यंत लोकांना समजत नाही की मोदी इतके लोकप्रिय कसे होत आहेत तोपर्यंत नरेंद्र मोदींचा सामना करणं शक्य नाही. असे ते म्हणाले.

हेही वाचा-Aryan Khan Drug Case: ज्ञानदेवाला लाडाने दाऊद म्हणण्या इतका महाराष्ट्र पुरोगामी होता; कुठे नेवून ठेवलाय हा महाराष्ट्र माझा

कुठे लपून बसलाय, सॅम डिसोझा? त्याच्यावर कारवाई का होत नाही? आर्यन खानच्या २५ कोटी रुपयांच्या मधील कथीत नाव गायब;

नवाब मलिक यांचा दावा ठरला खरा; समीर वानखेडेंचे खरे नाव समीर  दाऊदच

काही दिवसांपूर्वी हिरो म्हणून जगासमोर आलेल्या समीर वानखेडेंकडे आज व्हीलेन  म्हणून का पाहिलं जातंय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.