कुठे लपून बसलाय, सॅम डिसोझा? त्याच्यावर कारवाई का होत नाही? आर्यन खानच्या २५ कोटी रुपयांच्या ‘डिल’मधील कथीत नाव गायब…
2 ऑक्टोबरला एनसीबीने मुंबईच्या ‘कार्डिलीया’ क्रूजवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. आणि एनसीबीनेने केलेली ही कारवाई क्षणात वाऱ्यासारखी देशभर पसरली. एनसीबीचे अधिकारी ‘समीर वानखेडे’ सुरूवातीला या कारवाईमुळे हीरो म्हणून समोर आले. मात्र या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे गेला तस-तसे अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. आणि आर्यन खानच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, आणि समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ झाली.
ड्रग्स प्रकरणात ‘आर्यन खान’ला अटक केल्यानंतर त्याच्या हाताला पकडून एनसीबी ऑफिसला घेऊन जाणारा, ‘किरण गोसावी’ हा एनसीबीचा कोणताही अधिकारी नसल्याचे समोर आल्यानंतर, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पुढे या प्रकरणाचे अनेक धक्कादायक व्हिडिओ बाहेर आल्यानंतर, हे प्रकरण ‘फेक’ असल्याचे तर्क-वितर्क लावले गेले. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार असलेला ‘प्रभाकर साईल’ याने काही धक्कादायक खुलासे केले. आणि हे प्रकरण वेगळ्याच वळणावर गेल्याचे पाहायला मिळाले.
या प्रकरणाचा साक्षीदार ‘प्रभाकर साईल’ याने किरण गोसावी कर्डीलिया क्रुझवर छापा टाकण्यापूर्वी ‘सॅम डिसूझा’ या व्यक्तीला NCB ऑफिस कार्यालयाच्या खाली भेटल्याचा खुलासा केला. एवढंच नाही तर, या प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर या ‘सॅम डिसूझा’ आणि किरण गोसावी या दोंघांमध्ये २५ कोटीचा बॉम्ब टाकल्याची चर्चा होत होती. आणि १८ कोटीवर ही डील करू, कारण यातले ८ कोटी आपल्याला एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी द्यावे लागणार आहेत असं बोललं झाल्याचे किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केल्यानंतर एकच खळबळ उडाली. आणि समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्र्नचिन्ह उपस्थित झाले.
आपल्या नावावर अनेक गुन्हे असणारा ‘किरण गोसावी’ या प्रकरणात नेमका काय करत होता? आर्यन खानच्या हाताला पकडुन स्वतः एनसीबीच्या कार्यालयात घेऊन कसा काय जात आहे? पुढे आर्यन खान एनसीबीच्या ऑफिसमध्ये असताना, तो आर्यन खान सोबतचा फोटोही काढून सगळीकडे व्हायरल कसा काय करतो? सोबतच तो आर्यन खानचे कोनाशीतरी फोनवर बोलणं का करून देत आहे? संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई आणि देशातील सर्वात मोठा मनी लाँड्रिंग खेळाडू समजला जाणारा ‘सॅम डिसूझा’चा या प्रकरणाशी काय संबंध? तो सध्या काय करतोय? कुठे आहे? या सर्व प्रश्नांमुळे आता संपूर्ण एनसीबीच वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे बोलले जात आहे.
‘किरण गोसावी’ प्रभाकर साईंल हे दोघेही स्वतंत्र एनसीबीचे पंच आहेत. मात्र अनेक गुन्ह्यात गुन्हेगार असणारा किरण गोसावी या प्रकरणाचा पंच कसा? असे अनेक प्रश्न आहेत. परंतु या प्रकरणाचा पंच नसणारा सॅम डिसूझा या प्रकरणात कुठून आला? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर कार्डेलिया क्रूजवर छापा टाकण्यातपूर्वी आणि नंतर तो एनसीबी ऑफिसमध्ये काय करत होता? असे अनेक प्रश्न शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.
मुंबईचा आणि देशाचा मनी लॉन्ड्रिंगचा मोठा खेळाडू समजला जाणारा ‘सॅम डिसूजा’, हा एवढं सगळं महाभारत झाले तरीदेखील गायबच आहे. आणि विशेष म्हणजे, त्याला अजूनही एनसीबीने समन्सही पाठवलेले नाही. हा नेमका काय प्रकार आहे? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
या प्रकरणात महत्त्वाचा व्यक्ती असणारा ‘सॅम डिसूजा’ नक्की गायब कुठे झालाय? त्यावर अजूनही कोणतीही कारवाई का केली नाही? असे अनेक प्रश्न अनेकांनी उपस्थित केले असून,आता समीर वानखडे बरोबरच सीबीआय देखील वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पहिला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या- फरार असणाऱ्या किरण गोसावीचे अजब वक्तव्य; केला हा खळबळजनक दावा,आर्यन खान प्रकरणात नवीन ट्विस्ट
काम करता येत नसतील तर इथून निघून जा अमित शहांनी अधिकाऱ्यांना झापलं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम