काही दिवसांपूर्वी ‘हिरो’ म्हणून जगासमोर आलेल्या समीर वानखेडेंकडे आज ‘व्हीलेन’ म्हणून का पाहिलं जातंय? वानखेडेंच्या चौकशीचे काय झाले…
Aryan Khan Drug case: आर्यन खान’ड्रग्स’ प्रकरणात आता रोज नवीन नवीन धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले असल्याने, या प्रकरणाचा तिढा आणखीनच वाढत चाललेला दिसत आहे. दोन ऑक्टोबरला आर्यन खानला (Aryan Khan) ‘कार्डिलीया क्रुझ’ ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर संबंधित एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे कौतुक होत होतं. आर्यन खान यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर समीर वानखेडे जगासमोर एक हिरो म्हणून समोर आले. मात्र सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे प्रकरण खोटं असल्याचा दावा करत होते. परंतु नवाब मलिक राजकारणाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या आरोपाला फारसं महत्त्व नव्हतं.
‘नवाब मलिक’ (nawab Malik) हे समीर वानखेडे संदर्भात रोज नवनवीन खुलासे करत असल्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून देशभर हे प्रकरण चर्चेचा विषय बनला होता. मात्र समीर वानखेडे अजूनही जगासमोर हिरो म्हणूनच वावरत होते. परंतु दोन दिवसापूर्वी या प्रकरणाचा साक्षीदार असणारा ‘प्रभाकर साईल’ याने या प्रकरणात उडी घेत, काही धक्कादायक खुलासे केल्याने, या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे पाहायला मिळाले. आणि समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. (Sameer Wankhede was still a hero to the world.)
या प्रकरणाचा साक्षीदार ‘प्रभाकर साईल’ याने किरण गोसावी ‘कार्डिलिया’ क्रुझवर छापा टाकण्यापूर्वी ‘सॅम डिसूझा’ या व्यक्तीला NCB ऑफिस कार्यालयाच्या खाली भेटल्याचा खुलासा केला. एवढंच नाही तर, या प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर या ‘सॅम डिसूझा’ आणि किरण गोसावी या दोंघांमध्ये २५ कोटींचा बॉम्ब टाकल्याची चर्चा होत होती. आणि १८ कोटीवर ही डील करू, कारण यातले ८ कोटी आपल्याला एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी द्यावे लागणार आहेत. असं बोललं झाल्याचे किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड ‘प्रभाकर साईल’ याने केल्यानंतर, एकच खळबळ उडाली. आणि समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली.(And Sameer Wankhede’s difficulty increased.)
अनेक गुन्ह्यात आरोपी असणारा, किरण गोसावी हा या प्रकरणाचा साक्षीदार असल्याने अनेकांनी प्रश्र्न उपस्थित केले. पुणे पोलिसांनी किरण गोसावी यांना सहा ऑक्टोबरला ‘लुकआऊट’ नोटीसही काढलेली आहे. मात्र सगळ्यात धक्कादायक म्हणजे ‘सॅम डिसूजा’ या प्रकरणाचा साक्षीदार नसतानाही त्याचा या प्रकरणाशी असणारा संबंध, त्याचबरोबर एनसीबी ऑफिसमध्ये आर्यन खान सोबत असलेले त्याचे फोटो,यामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चांगलेच रडारवर आले.
‘प्रभाकर साईल’ याने या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम एका एफिडेविटमध्ये सादर केल्यामुळे, एनसीबीने समीर वानखेडे यांच्याविरोधात या प्रकरणाची चौकशी करण्याचे वरिष्ठांना आदेश दिले आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची आता वरिष्ठांकडून दक्षता चौकशी सुरू आहे. आर्यन खान प्रकरणाची पुढील कारवाई देखील समीर वानखेडे यांच्याकडून हिरावून घेत,आता हे प्रकरण नवीन अधिकारी पाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
A five-member team of NCB will go from Delhi to Mumbai tomorrow to probe the allegations of corruption made by Prabhakar Sail, who is a witness in the drugs-on-cruise matter of Mumbai. The team will comprise DDG NCB Gyaneshwar Singh along with 4 other NCB officers: Sources
— ANI (@ANI) October 26, 2021
२ ऑक्टोबरला आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून, कौतुक होणाऱ्या समीर वानखेडेंवर आता या कारवाईत काहीही तथ्य नसल्याचा आरोप होत आहे. शिवाय समीर वानखेडे यांनी ही कारवाई लाच घेण्यासाठीच केलेली असल्याचे, देखील बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी हिरो म्हणून जगासमोर आलेले समीर वानखेडेंकडे आज व्हिलेन म्हणून पाहिलं जातंय. मात्र आर्यन खान आणि समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचा,संपूर्ण तपास बाकी आहे. सत्य काय आहे? ते लवकरच बाहेर यायला हवं, अशी अनेक सर्वसामान्यांची इच्छा असल्याचे पाहायला मिळते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.