Gold Price Today: लवकरच सोनं पोहोचणार 80 हजारावर, खरेदी करा आत्ताच नाहीतर परत बसाल डोकं बडवत
Gold Price Today: तुम्ही जर दिपावलीच्या प्रसंगी धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ते भविष्याचा दृष्टीने उत्कृष्ट गुंतवणूक खरेदी होऊ शकते. आणि जर तुमच्याकडे सोन्याची अगोदरच गुंतवणूक असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. कारण आता मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल, अॅल्युमिनियम, तांबे, कोळसा यासह बऱ्याच कोमोडिटिच्या किंमती उच्चांक गाठण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Gold Price Today: Prices of many commodities, including crude oil, aluminum, copper and coal, are expected to reach higher levels.)
त्यामुळे असे मानले जाते आहे की पुढील टप्पा सोन्याचा आहे. पुढील काही दिवसात सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80,000 रुपये पार करू शकते. म्हणजेच आजच्या भावाच्या 40 टक्क्यांहून अधिक थोड्याच काळात सोने महाग होऊ शकते. आंतरराष्ट्रीय तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर उच्चांक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोन्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात 1800 डॉलर ते 3000 डॉलरपर्यंत वाढू शकतात असा अंदाज आंतरराष्ट्रीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. डेव्हिड गारोफेलोच्या मतानुसार कोरोनाच्या परिस्थीतीनंतर जागतिक चलनवाढीचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव 3,000 डॉलरपर्यंत पोहचू शकतील. जर सोन्याचा डॉलरमधील भाव भारतीय रुपयामध्ये रुपांतरीत केला तर भारतातील सोने, जे सध्या (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम सुमारे 49, 600 रुपयाच्या आसपास चालू आहेत.
प्रति 10 ग्रॅम 49,600 या सध्या सोने भारतीय बाजारात उपलब्ध आहे. नंतर ते 10 ग्रॅम प्रति 80,000 रुपये पार करू शकते.सोमवारी, सराफ मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याची किमंत 49,610 रुपये होती. जगभरातील अनेक मध्य्यवर्ती बँकांच्या मदत पॅकेज आणि कमी व्याजदर योजनांमुळे भांडवल बाजारात पैसा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणुक केलेल्या सोन्याच्या किमतीला गती देण्यासाठी ही बाब फायद्याची ठरू शकेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्याच्या कमी झालेल्या किमतीचा फायदा घेवुन आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याला स्थान देण्यास पसंद करू शकतात. गुंतवणुकदार सोन्यामध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक वाढवू शकतात. आतापर्यंत जेव्हा जेव्हा महागाई वाढली आहे तेव्हा सोन्याची मागणी देखील वाढलेली पाहायला मिळाली आहे. लोक त्यांच्या भांडवलाचे संरक्षण करण्यासाठी व चांगला नफा मिळविण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करताना पाहायला मिळतात.
भारतामध्ये सणासुदीला, विवाह सोहळ्या दरम्यान सोन्याच्या दागदागिन्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे या काळात भारतात सोन्याची मागणी वाढताना पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारात सोने आयात करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. नुकत्याच मिळालेल्या अहवालानुसार सोन्याचे आयातीचे प्रमाण 252 टक्क्यांनी वाढले आहे.
गेल्या वर्षी, 6.8 अब्ज डॉलर्सचे सोने आयात केले गेले होते, जे यावर्षी 24 अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सप्टेंबरमध्ये 5.11 अब्ज डॉलर्सचे सोने आयात केले गेले आहे . सोन्याच्या किमतीत व आयातीत चढ उतार हे नेहमी पाहायला मिळतात. याच दरम्यान योग्य संधी साधून गुंतवणुक करणे ही नेहमी फायद्याची ठरते.
नवाब मलिक यांचा दावा ठरला खरा; समीर वानखेडेंचे खरे नाव समीर दाऊदच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम