सर्वसामान्यांच्या ‘या’ प्रश्नासाठी मनसे करणार अंबानी विरोधात आंदोलन

0

Jio कंपनीने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी वोडाफोन (Vodafone), आयडिया(Idea) व एअरटेल (Airtel) सारख्या कंपन्या देशामध्ये टेलिकॉम क्षेत्रात अग्रेसर होत्या. 2016 मध्ये जेव्हा अंबानींची रिलायन्स जिओ (Jio) कंपनी देशामध्ये आपली टेलिकॉम सर्विस घेऊन आली. सुरुवातीच्या काळामध्ये मोफत इंटरनेट डेटा व मोफत कॉलिंग अशा दे दना दन ऑफर्ससह रिलायन्स जिओने (Jio) भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आपले पाऊल टाकले.

सुरुवातीच्या काळात अनलिमिटेड फ्री इंटरनेट डेटा आपल्या ग्राहकांना देत होते. नंतरच्या काळात जिओने (Jio) आपल्या पॉलिसीमध्ये बदल करत फ्री अनलिमिटेड ब्रेक लावला व ठराविकच इंटरनेट डाटा ग्राहकांना मोफत द्यायला चालू केला. जिओची (Jio) ही मोफत सर्व्हिस भारतीयांना चांगलीच पसंत पडली.  जिओच्या (Jio) दे दना दन इंट्रीमुळे भारतीय बाजारात जिओला लाखो ग्राहक मिळवणे अल्पावधीतच शक्य झाले.

ज्या काळात इतर कंपन्या आपल्या ग्राहकांकडून एक जीबी इंटरनेट डाटासाठी तब्बल दोनशे ते तीनशे रुपये आकारत होत्या. त्यात जिओ(Jio) कंपनीने आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड मोफत सर्विस द्यायला सुरुवात केली. त्यामुळे इतर कंपन्यांचे सिमकार्ड फक्त इनकमिंग कॉल साठी लोक वापरू लागले. वोडाफोन, आयडिया, एअरटेल सारख्या कंपन्या तोट्यात गेल्या. या कंपन्यांना जिओ कंपनीमुळे फार मोठा तोटा सहन करावा लागला. तर काही कंपन्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.

वोडाफोन, आयडिया, एअरटेल सारख्या इतर टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्या आपल्या ग्राहकांना लाईफ टाईम मोफत इनकमिंग ही ऑफर देत होत्या. सिम कार्ड घेतेवेळी त्यावर ती स्पष्टपणे लाईफ टाईम मोफत इनकमिंग सेवा असा उल्लेख केलेला होता. तरीदेखील मध्यंतरीच्या काळापासून या कंपन्यांनी दर महिन्याला ठराविक रीचार्ज केला तरच इन्कमिंग सेवा देण्यात येईल असे जाहीर केले. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला आपल्या सिमला रिचार्ज करणे बंधनकारक झालं.

टेलिकॉम कंपन्यांच्या मुजोरी पणाला वठणीवर आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना आता टेलिकॉम कंपन्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे. जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्या एका महिन्याचे पैसे घेऊन फक्त 28 दिवस सेवा देतात. एकंदरीत वर्षभराचा विचार केला तर सर्वसामान्य लोकांना एका महिन्याचे कुठलीही सेवा न घेता टेलिकॉम कंपन्यांना पैसे द्यावे लागत आहेत. याच मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे.

पैसे एका महिन्याचे घेता व सेवा 28 दिवसांचीच का देता? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे आणि याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश रत्नाकर नारकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन केले जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच मराठी माणसाच्या छोट्या-छोट्या मुद्द्यावर सवाल उपस्थित करून आंदोलन करत असते. टोल सारखा प्रश्न असेल किंवा मग मराठी भाषेचा मुद्दा असेल महाराष्ट्र निर्माण सेना नेहमीच या मुद्द्यांवर अग्रेसर असते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.