“काम करता येत नसतील तर इथून निघून जा”, अमित शहांनी अधिकाऱ्यांना झापलं

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते. नुकतेच ते  परतले आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच अमित शाह यांनी गृहमंत्री म्हणून जम्मू-काश्मीरला गेले होते. शहांनी आपल्या  तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍यांच्या भेटीही घेतल्या. अमित शाह यांनी दहशतवाद व सुरक्षा या विषयावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अमित शहांनी त्यांच्या दौऱ्यात थेट सुरक्षा अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी शनिवारी त्यांच्या दौऱ्या दरम्यान जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा व सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेतला आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची याबाबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये अमित शहा यांच्यासोबत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, जम्मू-काश्मीर पोलीस उपस्थित होते.

त्याशिवाय लष्कर, निमलष्करी दल आणि गुप्तचर यंत्रणांचे उच्च अधिकारी देखील बैठकीला हजर होते. नुकत्याच खोऱ्यातून अनेक नागरिकांच्या हत्येच्या घटना समोर आल्या असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा जम्मू काश्मीर दौरा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या उच्चस्तरीय बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदा गुप्तचर विभागाच्या प्रमुखांशी चर्चा केली व तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

गुप्तचर विभागातील उच्च अधिकाऱ्यांशी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला कशाप्रकारे आळा घालता येईल व प्रभावी उपाययोजनांबाबत विचारणा केली. गुप्तचर विभागातील अधिका-यांनी अमित शाह त्यांच्या कार्यशैलीबद्दल माहिती दिली. बरेच स्थानिक अधिकारी कारवाई करू इच्छित नाहीत असंदेखील अमित शहा यांना सांगितले. त्यामुळे अमित शाह स्थानिक अधिकाऱ्यांवर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

ज्या अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीर मध्ये काम करायला भीती वाटते त्यांनी काश्मीरमध्ये काम करू नये, त्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी आपले पोस्टिंग घ्यावे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. यावेळी मात्र ते अधिकाऱ्यांवर कमालीचे भडकल्याचे पाहायला मिळाले. स्थानिक अधिकारी योग्य ती कारवाई व ठोस पाऊले उचलत नसल्याची माहिती मिळताच अमित शाह यांचा पारा वाढला. त्यांनी मग अधिकाऱ्यांना खडासावल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ज्या अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीर मध्ये काम करायला भीती वाटते त्यांनी काश्मीरमध्ये काम करू नये, त्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी आपले पोस्टिंग घ्यावे, असे दोन वेळा अधिकाऱ्यांना सांगितले व अशा अधिकाऱ्यांनी ताबडतोप जम्मू-काश्मीरमधून निघून जावे असे देखील शहा म्हणाले. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी लष्कराच्या कमांडरांसोबत देखील चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या घुसखोरी सातत्याने कमी होत असल्याचे . अधिकाऱ्याने सांगितले. 2021या वर्षामध्ये केवळ अकरा घुसखोरी झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. त्यावर अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले की, जर घुसखोरी अकराच असेल तर हत्यासुध्दा कमी झाल्या पाहिजेत.  जर फक्त अकरा घुसखोरी झाल्या असत्या, तर आतापर्यंत काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद आणि लोकांच्या हत्येच्या घटना संपूर्णपणे संपायला हव्या होत्या.

पुढे बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, दहशतवाद व लोकांच्या हत्या संपूर्णपणे बंद व्हायला हव्या होत्या परंतु ते झाले नाही. हे योग्य उत्तर आहे असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न शहा यांनी अधिकाऱ्यांना विचारला. या बैठकीत जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव, डीजीपी काश्मीर, आयजी काश्मीर, इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉचे प्रमुख आणि केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला हे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या- फरार असणाऱ्या किरण गोसावीचे अजब वक्तव्य; केला हा खळबळजनक दावा,आर्यन खान प्रकरणात नवीन ट्विस्ट

जेष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानचा युक्तिवाद केल्यानंतर, न्यायालयाने एनसीबीला युक्तीवादच करु दिला नाही, कारण जाणून बसेल धक्का

आठ कोटीसाठी समीर वानखेडेने आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकवलं; प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम वाचून बसेल धक्का

आतंकवादी तालिबान्यांसमोर नतमस्तक होण्यास अफगाणिस्तान संघाचा नकार; या कारणामुळे राष्ट्रगीत गाताना रडले खेळाडू

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.