T20 World Cup 2021: ‘शेठ’ टिव्हीवर मॅच पाहत असतील,त्यामुळेच भारताचा ‘पराभव’ झाला; ‘पनौती’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड
T20 World Cup 2021: विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघ पाकिस्तानकडून एकदाही पराभूत झालेला नव्हता. मात्र काल खेळविण्यात आलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात, पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा 10 विकेट्सने धुव्वा उडवत, एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाव्यतिरिक्त या सामन्यात आणखी एक रंजक गोष्ट पाहायला मिळाली. (T20 World Cup 2021: ‘Sheth’ may be watching matches on TV, so it happened; The hashtag ‘Panauti’ is trending on Twitter)
रोहीत शेट्टी ‘दिग्दर्शित’ अक्षय कुमारचा बहुचर्चित आगामी चित्रपट सूर्यवंशी येत्या पाच, नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच राज्यातील चित्रपटगृहे उघडली आहेत. त्यामुळे अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट येत्या पाच नोव्हेंबरला चित्रपटगृहातच रिलीज होणार असल्याची माहिती मिळते.
आगामी चित्रपट सूर्यवंशी या चित्रपटाचे प्रमोशन डोळ्यासमोर ठेऊन, अक्षय कुमार भारत पाकिस्तानचा टि-ट्वेन्टी सामना पाहण्यासाठी काल थेट दुबईच्या स्टेडियममध्ये पोहचला होता. त्याच्यासोबत बीसीसीआयचे सचिव जय शहा देखील उपस्थित होते. दोघेही भारत-पाकिस्तान सामन्याचा आनंद घेताना, पाहिला मिळत आहेत.
जय शहा अक्षयकुमार दोघेही भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहून चिअर्स अप करत होते. मात्र हा सामना पाकिस्तान संघाने एकतर्फी जिंकत, या दोघांबरोबरच तमाम क्रिकेट चाहत्यांच्या स्वप्नांचा चकणाचुर केला. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतावर पाकिस्तानकडून पराभूत होण्याची नामुष्की ओढवली.
या पराभवाचे खापर फोडताना अनेकांनी, सोशल मीडियावर अजब तर्क वितर्क लावल्याचे पाहायला मिळाले. काही युजर्सनी तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले. “शेठ टीव्हीवर मॅच पाहत असतील त्यामुळेच भारताची अशी अवस्था झाली असावी” असा अजब तर्क काहींनी लावल्याचे पाहायला मिळाले. तर काहीनी ‘जय शहा’ आणि अक्षय कुमारलाही टार्गेट केल्याचे दिसून आले.
स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेले जय शहा आणि अक्षय कुमार यांना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. #पनौती हा ‘हॅशटॅग’ ट्विटरवर ट्रेंड करत अनेकांनी हे दोघे सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आल्यामुळेच भारताची अशी अवस्था झाल्याचं म्हटलं. या संदर्भातले अनेक मिम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले आहेत.
#पनौती
We all know who is he?? pic.twitter.com/AXCuCxEE67— Dravidian 🇮🇳 (@office_of_dk) October 24, 2021
कॅनडाचा नागरिक सामना पाहण्यासाठी मैदानात आल्यामुळेच, भारताची अशी दयनीय अवस्था झाली आहे. अशा प्रकारचे ट्विट्स अक्षय कुमारवर टीका करताना नेटकऱ्यांनी ट्रेंड केले आहेत. तर दुसरीकडे जय शहा यांना देखील ‘पनौती’ म्हणत, नेटकरांनी ट्विटरवर #पनौती हा हॅशटॅग ट्रेंड केला.
साहब से कहो, TV बंद करें।#Cricket
— Surya Pratap Singh IAS Rtd. (@suryapsingh_IAS) October 24, 2021
नेटकऱ्यांनी #पनौती हा हॅशटॅग ट्रेंड करत यामध्ये अनेकांना टार्गेट केल्याचे पाहायला मिळत आहे. या ट्रेंडमध्ये त्यांनी भारतीय कॅप्टन विराट कोहलीला देखील सोडलं नाही. विराट कोहली देखील भारतीय क्रिकेटला लागलेला एक ‘पनौती’ असून,त्याने कॅप्टन पदाचा राजीनामा दिला पाहिजे. असे नेटकरांनी विराट कोहलीवर टीका करताना म्हटल्याचे पाहायला आहे.
When you're a Canadian & watching India Pakistan match #INDvPAK#पनौती pic.twitter.com/TbnCyLqiKG
— 🇨🇦Canadian Deshbhakt🇨🇦 (@TheFlopKhiladi_) October 25, 2021
महत्वाच्या बातम्या-पाकड्यांकडून भारतीय संघ चारीमुंड्या चीत; नको असणारा विक्रम झाला नावावर
WhatsApp आता तुमच्या मोबाईलमध्ये चालणार नाही, जाणून घ्या काय आहे नवीन नियम..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम