Manmohan Singh: धक्कादायक…! ‘मोदींनी’ही वाहिली ‘मनमोहन सिंग’ यांना जिवंतपणी श्रद्धांजली

0

एकीकडे संपूर्ण देश भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची प्रकृती ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर अनेकांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जिवंतपणीच श्रद्धांजली वाहिली असल्याचे पाहायला मिळत आहे. यात अनेक नेत्यांचा देखील समावेश असल्याने त्यांना आता मोठ्या प्रमाणात ट्रोलही केलं जातंय. विशेष म्हणजे यामध्ये काँग्रेसच्याच एका आमदाराचा समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Prime Minister Manmohan Singh has been diagnosed with dengue, but his health condition is improving, AIIMS officials said Saturday.)

हेमंत सोरेन सरकारचे पर्यटन आणि क्रीडा मंत्री ‘हाफिजुल हसन अन्सारी’ यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जिवंतपणी श्रद्धांजली वाहत आपल्या अकलेचे तारे तोडले. हाफिजुल हसन यांनी आज एका मेळाव्याला संबोधित करतान संपूर्ण देशासाठी दुःखद बातमी असल्याचे सांगताना, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याची खोटी माहिती दिली.

ही खोटी माहिती देत असताना, मनमोहन यांनी भारताला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशात ५०टक्के विकास हा मनमोहन सिंग यांनीच केला असल्याचे ते सांगताना एका व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी देशाला पाठीमागे घेऊन जात आहेत. असंही ते म्हणताना दिसून येत आहेत. त्यांचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले जात आहे.

झारखंड सरकारचे पर्यटन आणि क्रीडा मंत्री ‘हाफिजुल हसन’ अन्सारी यांनीच फक्त जिवंतपणे श्रद्धांजली वाहिली असं नाही तर, काँग्रेसच्याही एका आमदाराने डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. राजस्थान मधील ‘निम का थाना’ मतदार संघाचे आमदार ‘सुरेश मोदी’ असं, या महाशयाचे नाव आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ‘फेसबुक पेजवरून’ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जिवंतपणे श्रद्धांजली वाहिली. मात्र ही चुकीची बातमी असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ही पोस्ट त्यांनी डिलीटही केली.

येवढ्या मोठ्या संवेदनशील विषयाचं गांभीर्य या जबाबदार नेतेमंडळीना नाही. ही खूप मोठी शोकांतीका असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. देशाच्या एका माजी पंतप्रधानांच्या मृत्यूची अधिकृत बातमी माहीत नसतानाही, कसल्याही प्रकारची खात्री न करता, अशा बेजबाबदारपणे वागण्याचा जाहीर निषेध करायला पाहीजे. या महाशयांनी लवकरात लवकर देशवासीयांची माफी मागितली पाहीजे,असा सूर नेटकऱ्यांनी लावला आहे.

मनमोहन सिंग यांच्या प्रकृती संदर्भात आम्ही एम्सच्या आधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती आता सुधारत असल्याचं डॉक्टरांनी महाराष्ट्र लोकशाही बोलताना सांगितले.

हेही वाचा- Rohit Pawar: अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष

Fact Check: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल, जाणून घ्या अधिक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.