Fact Check: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल, जाणून घ्या अधिक
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर एका फोटोसह व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याचा दावा केला जात आहे. अनेक वापरकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी आता आमच्यात नाहीत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती बुधवारी बिघडली होती. ताप आणि अशक्तपणाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यासंदर्भातील संपूर्ण बातमी महाराष्ट्र लोकशाही न्युजने दाखवली होती.
महाराष्ट्र लोकशाही न्युजने मनमोहन सिंग यांच्या मृत्यू संदर्भातील सत्यता जाणून घेतली आहे. या पडताळणी दरम्यान आम्ही एम्सचे पीआरओ अधिकारी बी एन आचार्य यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे आणि आता त्यांची प्रकृती स्थिर होत आहे. अशी माहिती आचार्य यांनी दिली.
तपासादरम्यान आम्ही व्हायरल फोटोच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला, आम्ही गुगलवर व्हायरल पोस्टमधील फोटोचा उलट शोध घेतला. आम्हाला झी न्यूजसह अनेक न्यूज वेबसाइट्सवर हा फोटो पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला फोटो देशाचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची भेट घेतलेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी एम्स रुग्णलयामध्ये माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावरून महाराष्ट्र लोकशाही न्युज हा दावा करते की व्हायरल बातमी खोटी आहे.
हेही वाचा – अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष
धक्कादायक मोदींनीही वाहिली मनमोहन सिंग यांना जिवंतपणे श्रद्धांजली.
जनताच रावणाची सत्ता उलथवून सीमोल्लंघन करेल; चित्रा वाघ यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट
Video: ग्रामपंचायतीचा तालिबानी कारभार, गतिमंद तरुणाला तोंडाला काळं फासून घातला चपलांचा हार
BMW TEX5 New Car;उदयनराजेंच्या ताफ्यात नव्या गाडीची एन्ट्री; किंमत जाणून व्हाल अवाक्
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम