Chitra wagh;जनताच रावणाची सत्ता उलथवून सीमोल्लंघन करेल; चित्रा वाघ यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट

लोकशाही ऑनलाईन: राष्ट्रवादीचं घड्याळ बाजूला सारून भाजपचं कमळ हातात धरणाऱ्या चित्रा वाघ गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. खासकरून महिलांच्या प्रश्नावर ते अधिक आक्रमक होताना दिसून आल्या आहेत. आज पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी दसऱ्याचे औचित्य साधून महाविकास आघाडी सरकारला रावणाची उपाधी दिली आहे. (Justifying Dussehra, Chitra Wagh once again launched a scathing attack on the Mahavikas Aghadi government)

एकेकाळी ‘चित्रा वाघ’ ह्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. मात्र मुंबईच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाइकाकडून लाच घेतल्याचा आरोप ‘चित्रा वाघ’ यांचे पती ‘किशोर वाघ’ यांचावर करण्यात आला. आणि त्यांनंतर काही दिवसातच चित्रा वाघ यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. (Sharad Pawar on Chitra wagh)

चित्रा वाघ यांनी आपण राष्ट्रवादी मधून बाहेर पडण्याचे कारण स्पष्ट करताना म्हटले होते,राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजीमुळे आपण नाराज असल्याने राष्ट्रवादीचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आपण देत असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये कसलीही गटबाजी नसल्याचे सांगत, चित्रा वाघ यांच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी लावल्यामुळे कदाचित त्या भाजपमध्ये गेल्या असतील असा टोला पवारांनी चित्रा वाघ यांना लगावला होता.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करायला सुरुवात केली. त्यांच्या कामावर खूष होऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद दिलं. एवढेच नाही तर त्यांचा थेट देशाच्या कार्यकारणी समितीमध्येही समावेश केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

मात्र महाविकास आघाडीवर सातत्याने हल्ले चढवले यामुळेच चित्रा वाघ यांना ही पदं मिळाली, असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांनी कडून सांगण्यात आलं. मात्र कोण काय म्हणाले? याचा कसलाही विचार न करता चित्रा वाघ सतत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर,सरकारवर हल्ला चढवत असतात‌. हे कोणालाही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

आज पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी दसऱ्याचे औचित्य साधून महाविकास आघाडी सरकारला थेट ‘रावणा’ची उपाधी देत, जोरदार हल्ला चढवला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एक ट्विट करत म्हटलं आहे, “१० तोंडं काय अन् ..३ तोंडं काय.. रावण तो रावणच, महिलांवर अत्याचार करणाऱ्या रावणासारख्या अपप्रवृत्तीचं दहन करायला हवं,त्यासाठी प्रत्यक्ष प्रभू राम तर अवतरणार नाहीत पण..रामरूपी जनताच रावणाची सत्ता उलथवून ख-या अर्थानं सीमोल्लंघन करेल” असा घणाघात चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्ष महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. (Chitra Wagh said that only Ramrupi people will overthrow Ravana’s power and transgress the boundaries)

हेही वाचा 

जनताच रावणाची सत्ता उलथवून सीमोल्लंघन करेल; चित्रा वाघ यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट 

Video: ग्रामपंचायतीचा तालिबानी कारभार, गतिमंद तरुणाला तोंडाला काळं फासून घातला चपलांचा हार

IPL 2021: धोनीच सुपर किंग धोनी विजयानंतर असं काय म्हणाला? ज्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय..

Dasara Melava; मी पुन्हा येईन म्हणणारे मी गेलोच नाही म्हणतायत,नाही गेला तर बसा तिकडेच;उद्धव ठाकरेंचा घणाघात 

BMW TEX5 New Car;उदयनराजेंच्या ताफ्यात  नव्या गाडीची एन्ट्री; किंमत जाणून व्हाल अवाक्

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.