IPL 2021: धोनीच’सुपर किंग’; धोनी विजयानंतर ‘असं’ काय म्हणाला? ज्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय..

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात झालेल्या आयपीएल सिझन१४ च्या फायनलमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा २७ धावांनी पराभव केला. आणि चौथ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली. विजयाबरोबरच महेंद्रसिंग धोनी चा सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गजांनी महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंगला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धोनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असल्याने हा विजय ऐतिहासिक मानला जातोय. Ipl2021 final won by CSK,)

2020 मध्ये झालेल्या आयपीएल सीझनला सुपर किंग संघ तळाशी राहिल्यामुळे अनेकांनी धोनीच्या नेतृत्वावर आणि या संघातील खेळाडूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र २०२१ला क्रिकेटचा बादशहा आपणच असल्याचे धोनीने सिद्ध करत, या सिझनची आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली.

कोलकत्ता नाइट रायडर्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले. कोलकत्त्याच्या गोलंदाजांनी एलिमिनेटर आणि क्वालीफायरमध्ये बेंगलोर आणि दिल्लीला १४० धावांचा टप्पा देखील गाठू दिला नव्हता. कदाचित हीच बाब लक्षात घेऊन कोलकत्ता नाइट रायडर्स चा कॅप्टन मॉर्गन प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र इथे खेळपट्टी वेगळी होती संघ वेगळा होता. फाफ डुप्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी हा निर्णय चुकीचा ठरवत, चेन्नई सुपर किंग संघाला भक्कम सुरूवात करून दिली. फाफ डुप्लेसिसने चेन्नई कडून सर्वाधिक 88 धावांची खेळी खेळत संघाला १९२ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याला ऋतुराज गायकवाड,रॉबिन उतप्पा, आणि मोईन अलींनी चांगली साथ दिली.

१९३ धावांचे भले मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरणार्‍या कोलकत्ता नाइट रायडर्स संघाच्या सलामीवीरांनी देखील मजबूत सुरुवात दिली. सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी १०.४ षटकात ९१ धावांची मजबूत सलामी दिली. वेंकटेश अय्यर याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवत 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ‘व्यंकटेश अय्यर’ बाद झाल्यानंतर कोलकता नाईट रायडर्स संघाचा डाव गडगडला. चेन्नई सुपर किंग संघाने भेदक मारा करत कोलकत्ता संघाच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला‌. नाईट रायडर्सचे ठराविक अंतराने गडी बाद होत गेल्याने त्यांना २० षटकात १६५ धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नई सुपर किंग संघाने तिन्हीं डिपार्टमेंटमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चौथ्यांदा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

धोनीची लोकप्रियता फॅन फॉलोइंग जगभरातून असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. कमी हेटर्स असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी पहिल्या क्रमांकावर येऊन हे कोणीही नाकारणार नाही. विजयानंतर धोनीने कोलकत्ता नाइट रायडर्स संघावर केलेला भाष्यामुळे पुन्हा एकदा धोनीचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहिला माहित आहे.

विजयानंतर प्रेझेंटेशन कार्यक्रमात धोनी कोलकत्ता संघाचे तोंड भरून कौतुक करताना दिसून आला. या कार्यक्रमात धोनी म्हणाला,”सीएसके संघाच्या विजयावर बोलण्यापूर्वी केकेआर संघावर बोलणे महत्त्वाचे आहे. आयपीएलच्या पहिल्या हाफमध्ये हा संघ ज्या स्थानावर होता, तिथून इतपर्यंत मजल मारणं हे खूप कठीण काम होतं. या आयपीएल सीजनमध्ये कोणी एक संघ जिंकण्यास पात्र होता,तर तो म्हणजे केकेआर संघ होता,असं मला वाटत होतं” धोनीने केलेल्या या भाष्यावर आता त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून धोनी ‘लीजेंड’ असल्याचं त्याने पुन्हा एकदा सिद्ध केल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे.                                                                      हेही वाचा 

जनताच रावणाची सत्ता उलथवून सीमोल्लंघन करेल; चित्रा वाघ यांचं पुन्हा वादग्रस्त ट्विट 

Video: ग्रामपंचायतीचा तालिबानी कारभार, गतिमंद तरुणाला तोंडाला काळं फासून घातला चपलांचा हार,

Dasara Melava; मी पुन्हा येईन म्हणणारे मी गेलोच नाही म्हणतायत,नाही गेला तर बसा तिकडेच;उद्धव ठाकरेंचा घणाघात 

BMW TEX5 New Car;उदयनराजेंच्या ताफ्यात  नव्या गाडीची एन्ट्री; किंमत जाणून व्हाल अवाक्

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.