Rohit Pawar: अजित पवार यांना डावलून रोहित पवार होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष
रोहित पवार हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचलं असून तरुणांमध्ये खूप मोठी चाहता वर्ग रोहित पवारांचा असल्याचं पाहिला मिळतं. सुरुवातीच्या काळात पवारांचा नातू म्हणून ओळख असणारे, रोहित पवार आता मात्र स्वतःची नवी ओळख करून बसलेत, हे कोणीही नाकारणार नाही. दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी नुकताच उभारलेला सर्वात उंच ‘स्वराज्य ध्वजा’ची देशभर चर्चा झाली. या सोहळ्याची ऐतिहासिक नोंद देखील झाली. (The highest ‘Swarajya Dhwaja’ was discussed all over the country.)
रोहीत पवारांची राजकारणातली ‘एन्ट्री’ खूप इंटरेस्टिंग असल्याचे पाहायला मिळते. राजकारणाच्या प्रवेशा यासंदर्भात रोहित पवार आणि शरद पवार यांची चर्चा झाली. शरद पवार रोहित पवारांना म्हणाले होते, तुला एकदा आमदार व्हायचंय की कायमस्वरूपी राजकारणात टीकायचंय? तुला एकदाच आमदार व्हायचे असेल तर, आपल्याकडे अनेक मतदारसंघ आहेत,ज्यामधून तु आमदार होऊ शकतो. मात्र रोहित पवारांनी दीर्घकाल राजकारणाचा विचार करत बीजेपीचा बालेकिल्ला समजला जाणारा,’कर्जत जामखेड’ हा मतदार संघ निवडला. (Considered to be the stronghold of the BJP, Karjat Jamkhed was chosen as the constituency.)
कर्जत जामखेड मतदार संघात बीजेपीची खूप मोठी ताकद आहे. या मतदार संघात १९९५ पासून बीजेपीचा बोलबाला राहिला आहे. बीजेपी कडून मंत्री राहिलेले राम शिंदे हे देखील सलग दोन वेळा या मतदार संघातून निवडून आले आहेत. रोहित पवार यांनी बीजेपीच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत नवा इतिहास रचला. विधानसभा निवडणुकीपूर्वी रोहित पवारांनी या मतदारसंघात दोन वर्षापासून काम सुरू केलं होतं. प्रत्येक शाळेत जाऊन चिमुकल्यांना वह्यांचे वाटप त्यावर त्यांचा फोटो, खाऊ वाटप, अशा छोट्या-छोट्या कामातून रोहित पवार यांनी या मतदारसंघात आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली.
रोहीत पवारांनी कर्जत जामखेड मतदार संघातून ऐतीहासिक विजय मिळवल्यानंतर,खऱ्या अर्थाने ‘रोहीत पवार पर्व’ सुरू झाल्याचे दिसून आले. आपल्या मतदार संघातील,अनेक विकास कामासंदर्भात संबंधित मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना भेटत, विकास कामांविषयी असणारी आपली भूमिका त्यांच्या कृत्यातून सातत्याने अधोरेखित होताना जनतेला पाहायला मिळाले आहे. फक्त विकासकामेच नाही, तर लोकांच्या वैयक्तिक समस्या देखील सोडवताना रोहित पवार प्रामुख्याने दिसून येतात.
मतदारसंघातल्या तसेच महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातील तरुणाने नवीन छोटा-मोठा उद्योग सुरू केला तर, रोहित पवार त्याच्या उद्घाटनासाठी आवर्जून उपस्थित असतात. त्यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत, प्रोत्साहन देतात. हे आपण अनेकवेळा पाहीलं असेल. त्यांच्या या साधेपणामुळे महाराष्ट्रभर त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. खासकरून तरुणांमध्ये त्यांची खूप मोठी क्रेज असल्याचे पाहायला मिळते.
विकासकामांविषयी त्यांची आस्था असल्याचे वारंवार दिसून येते. लोकांसोबत आपली नाळ कायम राहावी, यासाठी देखील ते प्रयत्न करताना सातत्याने दिसून येतात. मात्र याबरोबरच ते प्रचंड अभ्यासू असल्याचे देखील त्यांच्या बोलण्यातून अनेक वेळा जाणवतं. देशातल्या अनेक समस्यांविषयी, प्रश्नांविषयी त्यांना माहीती असते. काही प्रमाणात पवारांची झलक त्यांच्यामध्ये पाहायला मिळते.
राष्ट्रवादीच्या सध्या असणाऱ्या नेत्यांमध्ये रोहित पवार सगळ्यात जास्त मेहनती असल्याचे दिसून येते. शिवाय इतर नेत्यांच्या तुलनेत रोहित पवारांची प्रतिमाही स्वच्छ असल्याने,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोहित पवारांना राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष म्हणून घोषित केल्यास आश्चर्य वाटायला नको.
रोहित पवारांविषयी अजित पवारांनी एक भाष्य केलेलं मला आठवतं, एका कार्यक्रमात अजित पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला होता, येणाऱ्या काळात युवा पिढीमध्ये कोणाचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल? आदित्य ठाकरे,आदिती तटकरे, पार्थ पवार,अशा अनेक युवा नावांचा पर्याय त्यावेळी त्यांना दिला होता. मात्र क्षणाचाही विलंब न लावता अजित पवारांनी रोहित पवारांचं नाव घेत घेतलं होतं. यावरूनच पवारांच्या गुणवत्तेविषयी सगळे ज्ञात आहेत,हे लक्षात येतं.
अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल, अजित पवार यांच्या अगोदर रोहित पवार ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष’ कसे काय होतील? मात्र सध्या केंद्रीय यंत्रणांकडून अजित पवार यांच्या घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे. शिवाय अजित पवार यांच्यावर यापूर्वी देखील भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत. भ्रष्टाचार केला की नाही? यावर वेगळी चर्चा होऊ शकते. मात्र या आरोपामुळे अजित पवार यांची प्रतिमा मलीन झाली आहे, हे कदापिही नाकारता येणार नाही. याउलट सध्या रोहित पवार यांना महाराष्ट्रभरातून मिळणारा प्रतिसाद, प्रेम पाहून शरद पवार ही नवीन चाल खेळण्याची दाट शक्यता आहे. हेही वाचा- शिवसेना भाजपनंतर आता राष्ट्रवादीचीही हिदुत्वाकडे वाटचाल? रोहीत पवारांनी स्पष्ट केली भूमिका
धक्कादायक मोदींनीही वाहिली मनमोहन सिंग यांना जिवंतपणी श्रद्धांजली
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम