Uttar Pradesh:पिझ्झा खाण्याची इच्छा पडली महागात;तरुणीचा घेतला बळी,वाचून बसेल धक्का

उत्तर प्रदेश- डिप्रेशनमधून लहान मुलांपासून वयोवृद्ध मंडळी देखील आत्महत्या करताना आपण अनेकदा ऐकलं पाहिलं असेल. किरकोळ कारणांवरून आपलं आयुष्य संपवल्याच्या अनेक घटणा जगभरातून आपण ऐकत असतो,यात नविन असं काही नाही.

मात्र उत्तर प्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यातील एका मुलीने आत्महत्या केल्याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. एका वैद्यकीय विद्यार्थीनीचा बळी एका ‘पिझ्झा’ने घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ललितपूरच्या तालाबपुरा परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय शिखा सोनीने गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं आहे. ती एक नर्सिंगची विद्यार्थीनी असल्याची माहिती आहे. मात्र जेव्हा तीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे कारण समोर आले तेव्हा मात्र संगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.

शिखाचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर तीने आपल्याला पिझ्झा खायचा आहे. असा आग्रह धरलाय होता. मात्र काही कारणांमुळे दोन दिवस पिझ्झा तिला देता आला नाही. घरचे आपल्याला एक पिझ्झा देखील खाऊ घालत शकत नाहीत,असा तीचा समज झाल्याने ती दुःखी झाली आणि त्याच रात्री एका पिझ्झा साठी शिखाने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

एका पिझ्झा साठी १८ वर्षीय मुलीने आपलं आयुष्य संपवल्याने तिची आत्महत्या आता परीसरात चर्चेचा विषय बनला आहे. एका पिझ्झा साठी आपल्या मुलीने आपले आयुष्य संपवल्याने तिच्या घरचे खूप अस्वस्थ असून त्यांच्यावर खूप मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिखाला आणखी दोन बहीणी असून त्याही शिखांच्या जाण्याने तुटून गेल्या आहेत.

प्रेम करताय..? सावधान..! ..नाहीतर तुम्हालाही मिळेल सजा 

Uttar Pradesh:पिझ्झा खाण्याची इच्छा पडली महागात;तरुणीचा घेतला बळी,वाचून बसेल धक्का

Dasara Melava:वर्षभरात घडलेल्या सर्व गोष्टींची सव्याज परत फेड करणार:शिवसेना 

IPL-2021: काय सांगता? चेन्नईला धूळ चारून कोलकत्ता जिंकणार आयपीएलची फायनल

बापरे! पेट्रोल डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel price) कमालीची वाढ, या शहरात पेट्रोल 116 रुपये तर डिझेल 103 रुपयावर

Amazon Great Indian Festival : Redmi कंपनीचा हा स्मार्टफोन फक्त 7,020 मध्ये उपलब्ध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.