बापरे! पेट्रोल डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel price) कमालीची वाढ, या शहरात पेट्रोल 116 रुपये तर डिझेल 103 रुपयावर

0

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये (Petrol Diesel Price) होत असल्याने नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.  राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातपट वाढ झाली आहे.  गुरुवारी जयपूरमध्ये पेट्रोलची किंमत 116 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त झाली आहे.  पेट्रोलची प्रीमियम गुणवत्ता 116.18 रुपये प्रति लिटर नोंदवली गेली. ( Petrol and diesel prices have skyrocketed to Rs 116 per liter and Rs 103 per liter respectively.)

जयपूरमध्ये पेट्रोलची सामान्य गुणवत्ता 111.91 रुपये प्रति लीटर एवढी आहे.  त्याचबरोबर जयपूरमध्ये डिझेलची किंमत देखील तब्बल 103.07 रुपये प्रति लीटर एवढी झाली आहे. इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत मात्र भर पडली आहे. तेथील लोकांचे म्हणणे आहे की सरकार सातत्याने राजकारण करत आहे, यामुळेच राजस्थानच्या सर्वसामान्य लोकांना इंधन दरवाढीला सामोरे जावं लागत आहे.

पेट्रोलच्या किंमतीमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य लोकांच्या बजेटवर विपरित परिणाम होताना पाहायला मिळत आहे. एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जयपूरच्या पेट्रोल पंपावर एका  व्यक्तीने सांगितले, “मी एक बँकर आहे. इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे मला कार सोडून बाईक चालवणे भाग पडले. माझे बजेट इंधन दरवाढीमुळे कोलमडले  आहे.” असे त्या व्यक्तीने सांगितले.

राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  श्री गंगानगरसह राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांतील बरेच लोक आपल्या कारची टाकी भरण्यासाठी पंजाब आणि हरियाणाकडे जात आहेत.  राजस्थानमधील इंधनाच्या किमतींपेक्षा पंजाब हरियाणा येथील  किमती खूप कमी आहेत.

महाराष्ट्रातील जनतेचेसुध्दा पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे बजेट कोलमडत चालले आहे. दिवसेंदिवस पेट्रोलच्या किमती वाढत चालल्या आहेत. अनेकांच्या खिशाला आता झळ बसत आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईवर पण परिणाम होत आहे. मुंबईत पेट्रोल 110.12 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 100.66 रुपये प्रति लीटर एवढे आहे.

हेही वाचा:

प्रेम करताय..? सावधान..! ..नाहीतर तुम्हालाही मिळेल सजा 

Uttar Pradesh:पिझ्झा खाण्याची इच्छा पडली महागात;तरुणीचा घेतला बळी,वाचून बसेल धक्का

Dasara Melava:वर्षभरात घडलेल्या सर्व गोष्टींची सव्याज परत फेड करणार:शिवसेना 

IPL-2021: काय सांगता? चेन्नईला धूळ चारून कोलकत्ता जिंकणार आयपीएलची फायनल

बापरे! पेट्रोल डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel price) कमालीची वाढ, या शहरात पेट्रोल 116 रुपये तर डिझेल 103 रुपयावर

Amazon Great Indian Festival : Redmi कंपनीचा हा स्मार्टफोन फक्त 7,020 मध्ये उपलब्ध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.