Dasara Melava:वर्षभरात घडलेल्या सर्व गोष्टींची ‘सव्याज’ परत फेड करणार:शिवसेना

शिवसैनिकांसाठी ‘दसरा मेळावा’ हा ऊर्जेचा खूप मोठा स्त्रोत समजला जातो. शिवसैनिक हजारोंच्या संख्येने दसरा मेळाव्याला उपस्थित राहून या मेळाव्यातून ऊर्जा घेऊन जातात. आणि कामाला लागतात,असा इतिहास आहे. 27 नोव्हेंबर 1966 साली बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला हा दसरा मेळावा,अजूनपर्यंत अविरतपणे चालू आहे. बाळासाहेबांनंतर आता उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून आपल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आपली भूमिका स्पष्ट करत असतात.

दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा गेल्यावर्षी कोरोनामुळे खंडीत झाला होता. कोरोणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, गेल्यावर्षी दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, 50 जणांच्या उपस्थितीत पार पडला होता. यावर्षी मात्र दसरा मेळाव्याचे आयोजन ‘षण्मुखानंद सभागृहात’ ५० टक्के लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षभरात राजकीय चढ-उतार, आरोप-प्रत्यारोप पाहता या दसरा मेळाव्याला विशेष असे महत्त्व प्राप्त झालं असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचे संकेत देखील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी या संदर्भात बोलताना, या दसरा मेळाव्यात कोणा-कोणाला टार्गेट केले जाईल? याची थोडीशी चाहूल दाखवल्याचे पाहायला मिळाले आहे. वर्षभरात भारतीय जनता पार्टीकडून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या पाठीमागे केंद्रीय यंत्रणांची चौकशी जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप सातत्याने केला गेला. एवढंच नाही तर नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री केल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी वैयक्तिक हल्ले देखील केल्याचे पाहिला मिळाले. नुकत्याच झालेल्या लखीमपुर खेरी हिंसाचारात एका केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाने आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याने, देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

या हिंसेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने अकरा तारखेला महाराष्ट्र बंद घोषित केला होता. मात्र या महाराष्ट्रात बंदला भारतीय जनता पार्टीकडून कडाडून विरोध करण्यात आला. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा बंद म्हणजे “सरकार स्पॉन्सर दहशतवाद” असल्याची जहरी टीका केली होती. याचा देखील समाचार उद्धव ठाकरे आपल्या दसरा मेळाव्यातून घेताना पाहायला मिळू शकतं. आणि म्हणून या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं असल्याचं बोललं जातंय.

गेल्या वर्षभरात ज्या ज्या गोष्टी घडल्या, त्याची सहव्याज परतफेड केली जाईल,त्याच बरोबर आम्ही कोणाला निशाण्यावर घेत नाही, मात्र जर कोणी अंगावर आले तर त्याला सोडतही नाही. असा घणाघात संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपवर केला आहे. आणि म्हणून दसऱ्या मेळाव्याला विशेष असं महत्व प्राप्त झालं असून, उद्धव ठाकरे नक्की काय बोलतायत?कोणावर निशाणा साधतायत ? हे पाहणं खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रेम करताय..? सावधान..! ..नाहीतर तुम्हालाही मिळेल सजा 

Uttar Pradesh:पिझ्झा खाण्याची इच्छा पडली महागात;तरुणीचा घेतला बळी,वाचून बसेल धक्का

Dasara Melava:वर्षभरात घडलेल्या सर्व गोष्टींची सव्याज परत फेड करणार:शिवसेना 

IPL-2021: काय सांगता? चेन्नईला धूळ चारून कोलकत्ता जिंकणार आयपीएलची फायनल

बापरे! पेट्रोल डिझेलच्या किमतीत (Petrol Diesel price) कमालीची वाढ, या शहरात पेट्रोल 116 रुपये तर डिझेल 103 रुपयावर

Amazon Great Indian Festival : Redmi कंपनीचा हा स्मार्टफोन फक्त 7,020 मध्ये उपलब्ध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.