Virat Kohli:’विराट’ला जाणीवपूर्वक का टार्गेट केलं जातंय? टी-ट्वेण्टी नंतर आता ‘वनडे’चही कर्णधार ‘पद’ जाणार

भारताचा स्टार खेळाडू आणि कर्णधार ‘विराट कोहली'(Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कॅप्टन पदाविषयी सतत चर्चेत आहे.( India’s star player and captain Virat Kohli has been in the news for the last few months for his captaincy.)

२०१९च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला. आणि तिथून विराटच्या ‘कॅप्टन’ पदावर शंका उपस्थित व्हायला सुरूवात झाली.

वर्ल्डकप पराभवानंतर काही महिन्यांनी हा प्रश्न थंडावला. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा विराटच्या ‘कॅप्टन’ विषयीचा प्रश्र्न ज्वलंत झाला.

मर्यादित षटकांच्या क्रिकेट मधून विराटला कर्णधार पदावरून पाय उतार व्हावं लागणार असल्याच्या बातम्या काही प्रिंट मीडियातून छापल्या गेल्या.

१३ सप्टेंबरला ”The times of india” या वृत्तपत्राने म्हटले होते, विराट आणि BCCI यांच्यामध्ये वनडे आणि टी-ट्वेण्टी प्रकाराची कॅप्टनशी,रोहित शर्माकडे देण्याबाबत चर्चा झाली आहे. ‘वर्ल्डकप’नंतर लिमिटेड क्रिकेट फॉरमॅटचा पूर्णवेळ कर्णधार हा ‘रोहित शर्मा’ असणार असल्याचं या वृत्तपत्राने म्हटले होते.

“टाइम्स ऑफ इंडिया” या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीत काहीही तस्थ नसल्याचे BCCI चे कोषाध्यक्ष ‘अरुण धुमाळ’ यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर स्वतःविराटने वर्ल्डकप नंतर आपण आपल्या बॅटिंगवर लक्ष क्रेंदित करण्यासाठी टी-ट्वेण्टी क्रिकेच्या कर्णधार पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्याने आपल्या ट्विटर अकऊंटवरून सांगितले.

या नाट्यानंतर आता पुन्हा एकदा विराट मीडियाच्या टार्गेटवर आल्याचे पाहिल्या मिळत आहे. न्यूझीलंडकडून भारताला “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप”मध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर,’विराट’ अजिंक्य रहाणे आणि पुजारावर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन ओरडला,असल्याच्या बातम्या काल काही माध्यमांनी छापल्या.

‘विराट’ या दोघांवर ओरडल्यामुळे या दोघांनी बीसीसीआईचे सचिव ‘जय शाह’ यांच्याकडे तक्रार केली असल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली. मात्र आज लगेच ‘BCCI’ चे कोषाध्यक्ष ‘अरुण धुमाळ’ यांनी ही बातमी निव्वळ फेक आल्याचे सांगत अधिक चर्चेला पूर्णविराम दिला.

जरी असं काहीही घडलं नसल्याचे अरुण धुमाळ यांनी सांगितलं असल तरी,त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा? हा देखील मोठा प्रश्र्न आहेच. त्याचे कारण म्हणजे या पूर्वी देखील ते तोंडावर आपटल्याचे आपण सर्वांनी पहिलेच आहे.

ही बातमी खात्रीशीर आहे,की नाही? याविषयी काही प्रश्न असले तरी,ही बातमी निव्वळ अफवाच आहे. असं देखील आपल्याला ठाम म्हणता येणार नाही.

मात्र या निमित्ताने एक गोष्ट काही प्रमाणात का होईना स्पष्ट होते,ती म्हणजे विराटला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय. आता विराटला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय याचा थेट संबंध रोहित शर्माच्या ‘कॅप्टन’ पदाशी जोडला गेला असल्याचे,काही क्रीडा विश्लेषक खाजगीत बोलताना सांगतात.

विराटने टी-ट्ेण्टी क्रिकेटच्या कर्णधार पदाचा,टी-ट्वे्टी वर्ल्डकप नंतर,स्वतःहून राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे,असं आपल्याला वाटत असलं तरी,हे अगदीच सत्य आहे असं अजिबात नाही.

 

‘विराट’ आणि ‘BCCI’ यांच्यामध्ये ‘लिमिटेड क्रिकेट’ प्रकारच्या कॅप्टन पदाची धूरा ‘रोहित शर्मा’कडे देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. या बातमीत बऱ्याच प्रमाणात सत्यता आहे. मात्र या चर्चेतून काय समोर आले? हे ठामपणे सांगता येणार नाही. हेही तितकच खरं आहे.

टी-ट्वेण्टी विश्वचषकानंतर ‘विराट’ने आपण फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टी-ट्वेण्टी संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा देणार असण्याचे यापूर्वीच सांगितले आहे. याचा अर्थ तो कसोटी आणि वनडे अशा दोन्ही संघाचे नेतृत्व करेल असं क्रिकेट प्रेमींना वाटत आहे. मात्र टी-ट्वेण्टी वर्ल्ड कपमध्ये जर भारताचा पराभव झाला,तर त्याच्याकडून वनडे संघाचे देखील कर्णधारपद काढून घेतलं जाऊ शकतं. असं अनेक क्रीडा विश्लेषक सांगतात.

आतापर्यंत झालेल्या भारतीय कर्णधारांपैकी ‘विराट’ने तिन्ही प्रकारात सगळ्यात जास्त सामने जिंकले आहेत. मात्र त्याला कोणतीही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. या उलट ‘रोहित शर्मा’ने कमी कालावधीत आपल्या नेतृत्वगुणाचे कौशल्य दाखवले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चार वेळा ‘आयपीएल स्पर्धा’ जिंकली आहे. आणि यामुळेच विराटच्या कॅप्टन पदावर सध्या टांगती तलवार आहे.

अनेक माध्यमांनी ‘विराट’पेक्षा रोहित शर्माच बेस्ट कॅप्टन असल्याचा बातम्या अनेकवेळा चालवल्या. आता अशा चर्चा माध्यमांनी का चालवल्या? याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे? या विषयी वेगळी चर्चा होऊ शकते. मात्र जाणीपूर्वक विराटला टार्गेट केलं जातंय हे अजिबात नाकारता येणार नाही.

टी-ट्वेंटी वर्ल्डकप नंतर विराट कोहली वनडे क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कायम राहतोय का? हे पाहणं खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.