Big Boss 15: Big Boss 15’च्या पहिल्या स्पर्धकाचे नाव आले समोर, ही लोकप्रिय अभिनेत्री घेणार सहभाग

0

‌Big Boss 15 : सर्वात मोठा रियॅलिटी शो ‘बिग बॉस’ सध्या वूट सिलेक्टवर प्रसारित होत आहे. जवळपास एक महिन्यापासून ‘बिग बॉस ओटीटी’ची सुरुवात झाली आहे. Big Boss OTT खूप चर्चेत आहे. पण आता ‘बिग बॉस ओटीटी’ संपणार असून ‘Big Boss 15’ सुरू होणार आहे. ‘Big Boss OTT’ करण जोहर होस्ट करत आहे. तर ‘Big Boss 15’ सलमान खान होस्ट करणार आहे. शो कधीपासून सुरू होणार आहे याची तारीख मात्र जाहीर करण्यात आली नाही. (‘Big Boss 15’ will be hosted by Salman Khan. Actress Reem Sheikh is First Player of Big Boss 15. The date of the show has not been announced.)

‘बिग बॉस 15’ मध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचे नाव समोर आले आहे. सलमान खानच्या बिग बॉस 15 ची पहिली स्पर्धक रीम शेख असणार आहे. काही वाहिन्यांवरील वृत्तानुसार, रीम शेख यावर्षी शोमध्ये दिसणार आहे. रीम शेख या टीव्हीवरील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सुप्रसिध्द. ‘वो न बोले तुम ना मैंने कुछ कहा’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘तू आशिकी’ आणि ‘तुझसे है राब्ता’ या टीव्हीवरील मालिकांमध्ये रीम शेख यांनी भूमिका बजावली होती. आता रीम शेख ‘बिग बॉस १५’ साठी रीम शेख यांचे शिक्कामोर्तब झाले आहे.

बिग बॉसशोच्या निर्मात्यांना मागील काही दिवसांपासून रीम शेखला बिग बॉस शोमध्ये आणण्याची खूप इच्छा होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु रीम ‘तुझसे है राब्ता’ (Tuzse Hai Raabata) या मालिकेमध्ये व्यस्त होती त्यामुळे तिने बिग बॉससाठी रस दाखवला नव्हता. परंतु ‘तुझसे हैं राबता’ ही मालिका संपली आहे. त्यामुळेच ती बिग बॉस मध्ये येण्यास इच्छुक आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.