Bigg Boss: मराठी बिग बॉस विजेता मागतोय रस्त्यावर भीक; इतकी वाईट वेळ का आली..

0

Bigg Boss: बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये हजारो लोक दररोज आपले नशीब जमवताना पाहायला मिळतात. अनेकांना सक्सेस लवकर मिळतो. तर काहींना अक्षरशः आयुष्यभर स्ट्रगल करावा लागतो. याची अनेक उदाहरणे देखील आपल्याला सांगता येतील. मनोरंजनच्या दुनियेत कोणताही कलाकार कायम स्टार कधीच राहत नाही. आज सुपरस्टार असलेला कलाकारही काही दिवसांनंतर हलाखीचे आयुष्य जगताना देखील अनेकदा पाहण्यात आलं आहे.

नुकताच बिग बॉस सीजन 17 पार पडला. बिग बॉस ‘रिॲलिटी शो’चे सूत्रसंचालन सलमान खान (Salman Khan) करत असल्याने बिग बॉस या रिॲलिटी शोला प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली. बिग बॉस या रियालिटी शोचे प्रादेशिक भाषांमध्ये देखील चित्रीकरण करण्यात येऊ लागलं. प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या रिॲलिटी

शोला देखील प्रचंड लोकप्रियता मिळू लागली. मराठी बिग बॉस या रिॲलिटी शो’ला देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. मराठी बिग बॉस स्पर्धेच्या ‘सेकंड सीजन’चा विनर शिव ठाकरे (shiv thakare) बनला होता. तो नुकताच खतरों के खिलाडी या रियालिटी शोमध्ये देखील पाहायला मिळाला. सध्या तो ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये आपल्या डान्सचा जलवा दाखवताना पाहायला मिळत आहे. मात्र आता अचानक रस्त्यावर त्याला भीक मागताना पाहण्यात आल्याने, अनेकांना धक्का बसला आहे.

बिग बॉस 16 या रियालिटी शोमध्ये देखील शिव ठाकरे रनरअप राहणार राहिला होता. शिव ठाकरेने स्वतःची जंटलमेन म्हणून ओळख निर्माण केली आहे. शिव ठाकरे रस्त्यावर भीक मागताना पाहण्यात आला असला तरी तो एक पीआर स्टंट होता. शिव ठाकरेने स्वतःचा मेकअप एका भिकऱ्या सारखा केला होता. साहजिकच त्यामुळे त्याला कोणीही ओळखलं नाही. अनेकांनी त्याचा चेहऱ्यावरच्या फोड्या बघून बाजूला देखील केल्याचं पाहिला मिळत आहे.

शिव ठाकरेने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून भीक मागत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. शिव ठाकरेच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारच्या फोड्या असल्याने, जवळचे लोक बाजूला देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनी शिव ठाकरेला पैसे देण्यास नकार दिला. मात्र एका रिक्षा चालककाने शिव ठाकरेला काही पैसे देखील दिल्याचे, या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Ricky ponting on Rishabh pant: ऋषभ पंत खेळणार; रोहित शर्मा कर्णधार? कोच पाँटिंगकडून आयपीएल प्लॅन विषयी खुलासा..

U19 World Cup 2024 : बीडच्या सचिन धसमुळे भारत फायनलमध्ये; कोण आहे सचिन धस? तेंडुलकरशी आहे खास नातं..

ritika sajdeh on Mumbai Indians: रोहित शर्माला कॅप्टनसीवरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताच पत्नी रितिका भडकली; पोस्ट करून म्हणाली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.