Taliban New Government: अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारची घोषणा, मुल्ला हसन अखूंद पंतप्रधान (Mullah Mohammad Hassan Akhund)

0

Taliban New Government: नुकताच तालिबान्यांनी अफगाणिस्तान देशाचा ताबा घेतला आहे.  सर्वांना एकच प्रश्न पडला होता की, तालिबान  कारभार कसा करणार? मात्र तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार स्थापन  केल्याची माहिती मिळाली आहे. तालिबानने नुकतीच पंतप्रधान, उपपंतप्रधान यांच्यासह घोषणा केली आहे. तालिबानचे  अफगाणिस्तानचे नवे पंतप्रधान हे मुल्ला मोहम्मद हसन अखूंद (Mullah Mohammad Hassan Akhund)  असणार आहेत. (Taliban announce his new government and all ministers mullah mohammad hassan akhund is prime minister of afghanistan all live update)

अफगाणिस्तानच्या  नव्या मंत्रिमंडळाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. हसन अखूंद हे अफगाणिस्तानचे पंतप्रधान असणार आहेत. याअगोदर मुल्ला बलादर यांच्या नावाची पंतप्रधान म्हणून चर्चा होती, मात्र त्याला सरकारमध्ये उपपंतप्रधान म्हणून समाधान मानावे लागणार आहे.     तालिबानच्या या मंत्रिमंडळामध्ये हक्कानींना महत्वाचे खाते  भेटलेलं आहे. सिराजुद्दीनं हक्कानी हे अफगाणिस्तानचे नवे गृहमंत्री असतील.

मंत्रिपदासाठी दोन संघटनांमध्ये वाद

वजनदार खाती मिळण्यासाठी हक्कानी आणि तालिबानी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला होता. याच तणावाचा फायदा हक्कानींना मिळाल्याचं दिसतंय. अमीर मुताकी हे नवे परराष्ट्रमंत्री असतील. अब्दूल सलाम हंफू यांना देखील उपपंतप्रधान करण्यात आले आहे. म्हणजेच अखुंद हे पंतप्रधान आणि  बरादर आणि हंफू हे दोघे उपपंतप्रधान असणार आहेत.  दोन उपपंतप्रधान असलेला अफगाणिस्तान सध्या जगातला त एकमेव देश असावा.

मुल्ला हसन अखूंद कोण आहे?

मुल्ला हसन अखूंद हा तालिबानच्या संस्थापकांपैकी एक आहे. ते तालिबानच्या मागच्या सरकारमध्ये त परराष्ट्र मंत्री होते. महत्वाची बाब म्हणजे यूएनची दहशतवाद्यांच्या  यादीमध्ये आहे  मुल्ला हसन अखूंद यांचं नाव आहे.  तालिबानचा ज्या ठिकाणी उदय  झाला त्या कंदहार याच ठिकाणचे  अखुंद हे आहेत. गेले वीस वर्ष  तालिबानसाठी त्यांनी काम केल्याची माहिती मिळत आहे. अखूंद हे यांची खळबळजनक ओळख जगाला नाही मात्र ते मास्टर माईंड म्हणून काम करत आहे. गेली अनेक वर्ष तालिबानसाठी  महत्वाची भूमिका बजावल्यानेच अखूंद याला  पंतप्रधान पदी बसल्याचे बोलले जात आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.