Solapur News;’गांजा’शेतीच्या परवानगीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहीण्याची कल्पना अनिल पाटलांना कशी सुचली? वाचा सविस्तर!

0

सोलापूर प्रतिनिधी;सध्या शेतकऱ्यांचा शेतीमाल कवडीमोल भावाने विकला जात असल्याने,मोहोळ तालुक्यातील, शिवापूर गावातील,’आबाजी पाटील’या शेतकऱ्याने कमालीची शक्कल लढवली आहे. त्याने जिल्हाधिकारी यांना लिहीलेले पत्र सध्या शोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून,त्याने लढवलेल्या शकलेचे देखील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचे मोठे संकट शेतकऱ्यांवर आले,असतानाच शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने विकला जात असल्याने, शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे पहायला मिळत आहे.

ढोबळी मिरची,टोमॅटो,गवार,अशी अनेक पिके शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिल्याचे व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाले होते. प्रचंड मेहनत करून शेतकरी शेतात प्रचंड उत्पन्न काढतो. मात्र सध्या बाजारात कवडीमोल भावाने आपला माल त्याला विकावा लगत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या कोणत्याही तरकारी पिकांना भाव नसल्याने, शेतकऱ्यांनी केलेली मेहनत,मशागत औषध फवारणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी प्रचंड संतप्त असल्याचं दिसून येत आहे.

अशीच काहीशी परिस्थिती मोहोळ तालुक्यातील,शिरापूर गावातील,’अनिल आबाजी पाटील’ या शेतकऱ्याचीही झाली आहे. शेतीमालाला बाजार भाव, हमीभाव नसल्याने अनिल पाटील संतप्त असल्याचे चित्र आहे.

*गांजाची शेती करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी,ही कल्पना तुम्हाला कशी सुचली?*

पिकांना बाजार भाव,हमीभाव नसल्याने अक्षरशः शेतीच्या मशागतीला झालेला खर्च देखील निघत नाही. शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज फेडणं त्याला शक्य नसतं,कारण शेतीव्यतिरिक्त दुसरा कोणताही जोडधंदा त्याच्याकडे नसतो. आणि म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही.

मात्र आत्महत्या केल्याने आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या समस्या मिटणार नाहीत,आणि म्हणून प्रचंड भाव असणाऱ्या पिकांची शेती करण्याची कल्पना सुचली. अर्थात प्रचंड भाव असणारं पिक सर्वप्रथम डोळ्यासमोर उभं राहीलं ते गांजाचं.

आणि म्हणून गांजाची शेती करण्याची कल्पना सुचली. साहजिकच गांजाच्या शेतीला बंदी असल्याने आम्ही त्याची रितसर परवानगी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागितली. अशी माहिती शेतकरी अनिल आबाजी पाटील यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना सांगितली.

 

मी केळी लागवड केली होती. केळी लागवड करण्यासाठी माझा जवळपास साडेचार ते पाच लाख खर्च झाला होता. मात्र भाव नसल्याने माझा झालेला खर्च देखील निघाला नाही. आणि मी केळीचा फड अक्षरशः सोडून दिला. शेतीत कोणतेही पीक घेताना त्याला भाव मिळेल का नाही? याची खूप मोठी चिंता सतावत असते,मात्र गांजाच्या शेतीमध्ये अशी परिस्थिती नसते. असंही अनिल पाटील महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना म्हणाले.

अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे, माझी शिवापूर, ता,मोहोळ या ठिकाणी स्वतःच्या मालकीची जमीन गट नंबर,१८१/४ असून या क्षेत्रात मला दोन एकर गांजा लावण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी.

मी एक शेतकरी असून,कोणतेही पीक केले तरी,त्याला शासनाचा हमीभाव नसल्याने,शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. आणि यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही.

साखर कारखान्यांना ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे बिल देखील लवकर माहित नाही, आणि म्हणून मला माझ्या गटामध्ये दोन एकर गांजा लावण्यास परवानगी मिळाली.

१५ सप्टेंबर २०२१पर्यंत मला गांजा लागवड करण्याची लेखी परवानगी द्यावी. अन्यथा मी १६ तारखेला आपल्या प्रशासनाकडून मला परवानगी मिळाली आहे,असे गृहीत धरून मी लागवड करणार आहे. जर माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर, याला आपले प्रशासन जबाबदार राहील. अशा आशयाचे एक पत्र शेतकरी अनिल आबाजी पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.