Breaking: राज्यातील तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता; Maha TET परीक्षा लवकरच

राज्यामधील तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांना राज्य शासनाकडून  दिलासा मिळण्याची शक्यता आहे . कारण लवकरच तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्रोफेसरांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापक निवडींबाबत धोरणाचा अभ्यास करून  नवीन पर्यायी धोरण राज्य शासनाला  सुचवण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती ६ सदस्यांची आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ही समिती गठीत करण्यात आली आहे.  राज्य सरकारला ही समिती दोन महिन्यांमध्ये नवीन पर्यायी धोरण सरकारपुढे ठेवणार आहे. (Committee formed by the Department of Higher and Technical Education to solve the problems of professors)

पुण्यामध्ये प्राध्यापकांनी आंदोलन केले होते. त्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. राज्य शासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली गेली व  त्यानंतर राज्याचे व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत नवीन पर्यायी धोरण तयार करण्यासाठी ६ सदस्यीय समिती गठीत केली आहे.  त्यामुळे आता लवकरच तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

Maha TET परीक्षा लवकरच; ४० हजार शिक्षक भरती

गेले दोन वर्ष महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली नाही. शेवटची परीक्षा ही २०१८-१९ मध्ये झाली होती.  MAHA TET परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे.  १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर ह्या दरम्यान Maha TET परीक्षा घेण्यात येणार आहे. एकूण ४० हजार  रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मध्यमिक शाळांमधील १३ हजार व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या २७ हजार रिक्त पदांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.  या नियुक्त्या टप्प्या टप्प्याने होणार आहेत. पहिला टप्पा हा ६१०० पदांचा असेल.

40 हजार शिक्षकांची भरती, MAHA TET परीक्षेचा कालावधी ठरला

शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.