Job: PDCC Recruitment 2021: ३५६ रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

Job: PDCC Recruitment 2021: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (PDCC) लिपिक या पदासाठी (clerk) या पदासाठी  भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. PDCC बँकेकडून अधिकृत वेबसाईटवर   याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.  ज्या  उमेदवारांना पीडीसीसी बँक क्लर्क  भरती २०२१ साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे ते उमेदवार अर्ज भरू शकतात.   सरळसेवा भरती प्रक्रियेनुसार PDCC  बँक भरती प्रक्रिया होणार आहे. एकूण ३५६ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे बँकेकडून जाहीर करण्यात आले आहे. ( Job: PDCC Recruitment 2021:  Pune District Central Co-operative Bank (PDCC) will be recruiting for the post of Clerk.)

पात्रता:
उमेदवाराने पदवी (Graduation) किंवा पदव्युत्तर पदवी ( Graduation) किमान ५० टक्के गुणांसह पूर्ण केले असावे. सोबतच उमेदवाराने एमएससीआयटी (MSCIT)  किंवा तत्सम संगणकीय कोर्स पुणे केलेला असावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख  १६ ऑगस्ट २०२१ असून उमेदवार १७ ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरु शकतात. परीक्षेचे वेळापत्रक मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. वेळापत्रक ऑनलाईन कळवण्यात येईल असे बँकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

३५६ पदांसाठी ही भरती होणार आहे.  बँकेच्या ऑनलाईन परीक्षेची फी ८८५ रुपये असणार आहे.  परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ही १६ ऑगस्ट असणार आहे. १७ ऑगस्ट पर्यंत तिन्ही परीक्षा शुल्क जमा करू शकता. निवड झालेल्या उमेदवारांना प्रोबेशन पिरिड मध्ये १३५०० रुपये एवढा पगार मिळणार आहे.

या परीक्षेसाठी काय अभ्यासक्रम असेल?

परीक्षा एकूण १०० मार्कस ची असणार आहे.  त्यातील ९० मार्कस हे ऑनलाईन परीक्षेसाठी असणार आहेत. ऑनलाईन परीक्षा ९० मार्क्सची असणार आहे. त्यामध्ये ऑनलाइन परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपात प्रश्न (Multiple Choice Questions)  स्वरुपाच्या  असणार आहेत. बँकिंग व सहकार,  सामान्यज्ञान (General Knowledge) व चालू घडामोडी , कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी भाषा ज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान (Computer and Technology) आणि बुद्धिमापन चाचणी  या आधारित परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील.

उर्वरित १० मार्कस ची मुलाखत ही ऑनलाईन परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे.  मुलाखत झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर होईल. ही यादी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल.

मुलाखतीसाठी १० गुण नि्चित करण्यात आले आहेत. ऑनलाइन परीक्षेत ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

PDCC बँकेतील लिपिक पदाच्या भरतीचा  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://www.pdccbank.co.in/ आणि https://www.pdccbank.co.in/career या वेबसाईटला भेट द्यावी.

नोकरी अलर्ट मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा

maharashtralokshahi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.