Photo: कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कसे वसूल करते कर्ज?

Photo

जर एखाद्या व्यक्तीने बँकेकडून कर्ज (loan) घेतले आणि कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक त्या व्यक्तीने घेतलेले कर्ज कसे वसूल करते? हा प्रश्न तुम्हाला देखील कधीतरी पडला असेल. ज्या व्यक्तीने बँकेकडून कर्ज घेतले आहे आणि तो मरण पावला तर अशा वेळी कर्जाची उर्वरित रक्कम कोण भरते हे जाणून घेऊया. तर त्यासाठी बँकेला काही निर्बंध किंवा नियम घालून दिलेले असतात याबाबत आपण जाणून घेऊया. (  If the borrower dies, who has to pay the rest, know what the rules are)

Photo

कर्जदार व्यक्तीने कोणत्याची प्रकारचे म्हणजे वयक्तिक, व्यवसाय कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज घेतले असेल  आणि कर्जदार व्यक्तीचां मृत्यू झाला तर त्या घटनेचा बँकेला काहीही फरक पडत नाही. कारण बँकेकडून कर्ज घेताना बँकेकडे काहीतरी तारण ठेवलेले असते.  बँक काहीही झाले तरी  कर्जदाराकडून पैसे वसूल करेल त्याच्या मृत्यूनंतर देखील. कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी  प्रत्येक लोनसाठी  वेगवेगळे नियम आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे होमलोनसाठी  वेगळे नियम आहेत, पर्सनल लोनसाठी  वेगळे नियम आहेत, वाहन कर्जासाठी वेगळे नियम आहेत.

Photo

होमलोन घेतलेला  कर्जदार मरण पावल्यास, कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्जाची बँकेला परतफेड करण्यासाठी सह-अर्जदार किंवा हमीदार जबाबदार असतो. काही परिस्थितीमध्ये  जर हे दोघेही नसतील तर बँक कर्जदार व्यक्तीच्या वारसाला संपर्क करेल, जो कर्जदाराने बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेचा वारस असेल. कर्जदाराच्या मालमत्तेच्या वारसाकडून जर कर्जवसुली शक्य नसेल तर बँक तारण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करून आपले कर्ज वसूल करून घेऊ शकेल.

Photo
Photo

कर्जदाराच्या मृत्यूनंतर कर्ज माफ करावे  असा कोणताही कायदा आपल्या देशात नाही.  मग कोणतेही कर्ज असले तरी देखील कर्जदाराला यातून मुभा मिळत नाही त्याचा मृत्यू झाला असला तरीसुद्धा.  कुठल्याही प्रकारचे कर्ज कर्जदारांने घेतले असेल तरी हा नियम सर्व प्रकारच्या लोनसाठी लागू आहे. सध्याच्या काळात बँक कर्जदाराला कर्जावर विमा घ्यायला लावते. बँक त्या विमा कंपनीकडून ही रक्कम घेते. म्हणजे बँक ही रक्कम विमा कंपनीकडून वसूल करते आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक कर्ज माफ करते.

Photo
Photo

 त्या व्यक्तीशी संपर्क साधेल जो कर्जदाराच्या मालमत्तेचा कायदेशीर वारस असेल. या सर्व मार्गांद्वारे, जर बँकेला असे वाटत असेल की त्याचे कर्ज फेडणे शक्य नाही, तर ती त्या मालमत्तेचा लिलाव करेल आणि आपली थकबाकी वसुल करेल. बदलत्या काळात प्रत्येक प्रकारच्या कर्जाचा विमा उतरवला जातो. बँक या विम्याचा प्रीमियम ग्राहकांकडूनच भरते. अशा परिस्थितीत जर कर्जदार मरण पावला तर बँक विमा त्या कंपनीकडून पैसे घेते.

 

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.