Tree Plantation: फलटणच्या झनझने सासवड येथील तरुणांनी तब्बल 1000 झाडांचे केले वृक्षारोपण.

0

Tree Plantation: फलटण तालुक्यातील झणझणे सासवड (Zanzane Saswad) येथील महात्मा फुले युवा मंच यांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची एक हजार लागल्यात आली आहेत. काही तरुणांनी एकत्रित येऊन हे भव्य दिव्य असे वृक्ष लागवडीचे खूप मोलाचे कार्य पार पाडले आहे. आज-काल निसर्गाचा समतोल ढासळत चाललेला आहे. वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, वाहने यामुळे पर्यावरणाचा रास होत चालला आहे. हवा दूषित होत चालली आहे परंतु अनेकदा या गोष्टीचे गांभीर्य अनेक लोकांना नसते. मात्र या तरुणांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. ( Tree Plantation: In Phaltan taluka, the youth of Saswad planted 1000 trees.)

ही झाडे काळज ते सासवड- माळीबेंद रोड बाजूने लावण्यात आली आहेत. त्यामध्ये कडू लिंब, नांदरुक, चिंच, शिसव,करंज, इत्यादी विविध प्रकारची झाडे लावली आहेत. या झाडांची काळजी घेण्यासाठी रोजगार हमी योजनेतून  एक टीम तयार केली आहे. त्या टीम ने पाणी घालने, झाडांची निघा राखणे, देखभाल करणे, काही कारणास्तव झाड जगू शकले  नाही तर त्या ठिकाणी नवीन झाड लावणे, इत्यादी कामे त्यांना दिली आहेत. ही झाडे खरेदी करण्यासाठी तेथील  ग्रामपंचायती कढून एक पत्र वन विभागला देऊन  त्यांच्याकडून झाड मिळवली गेली.

झणझने सासवड

खड्डे खोदण्याचे काम करण्यासाठी  अर्जुन कोळेकर यांच्याकडून जे.सी.बी  मिळाला, झाडांना पाणी घालण्यासाठी ट्रॅक्टर अमोल रासकर यांनी दिला, आणि माती आणण्यासाठी ट्रॅक्टर योगेश जाधव यांनी दिला. हे  सर्व  मदत आणि आपल्या गावप्रती व पर्यावरणावर असलेल्या प्रेमापोटी  मिळालं. कोणीही यासाठी पैसे  घेतले नाहीत.  झाडांसाठी खड्डे, माती, खते, पाणी आणि या सर्वांसाठी लागणारी ट्रॅक्टर, टँकर  इतर वाहने  यासाठी सर्व सहकारी मित्रांच्यात वर्गणी काढून खर्च केला आणि लागवडी नंतरचा संगोपणाचा खर्च बिहार पॅटर्न च्या माध्यमातून केला जाणार आहे.

ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम करत असताना पर्यावरण बाबत शासन अधीकाधीक योजना राबवताना दिसून आले. या योजनाचा लाभ घेऊन आपण आपल्या भागात काही तरी चांगल काम तर करूच करू.  परंतु त्यासोबत निसर्गाचा समतोल राखण्याच्या बाबत, आणि भावी पिढीसाठी स्वच्छ सुंदर आणि निरोगी अशी हवा मिळण्यासाठी  आपले काहीतरी योगदान राहील हीच एक सदभावना, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिद्द देत होती. हा प्रस्ताव सर्व मित्रांसमोर ठेवला व सहा महिन्यापूर्वीचं पावसाळ्यात वृक्षारोपण करायचं हे ठरवलं मग त्यानुसार माती,खते, रोपे पाण्याचं नियोजन  वगैरे सर्व गोष्टी बाबत कसा मार्ग काढायचा याबाबत पूर्ण प्लांनिंग करून पावसाळ्याच्या सुरुवातीला फलटण वनविभागाला ग्रामपंचायत माध्यमातून प्रस्ताव देऊन त्यांच्या माध्यमातून झाडे मिळवली त्यामुळे झाडांचा रोपाचा संपूर्ण खर्च वाचवला. अशी प्रतिक्रिया तेथील स्थानिक ग्रामपंचायत सदस्य देत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.