म्हतारपणात बंडा तात्या कराडकरांना जेलची हवा; साताऱ्यात गुन्हा दाखल, महिला आयोगानेही घेतली दखल

0

‘किराणा’आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याच्या विरोधात आज साताऱ्यात बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने ‘दंडवत दंडुका’आंदोलन करण्यात आले. बंडातात्या कराडकर यांचं हे आंदोलन आज राज्यभर चर्चेत राहिले. आंदोलनानंतर बंडातात्या कराडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक धक्कादायक आणि वादग्रस्त खुलासे केले. मात्र आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर सातारा पोलीसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात, असं वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी आज या आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना केले. एवढंच नाही तर, पतंगराव कदम यांचा मुलगा कशाने वारला? हे मला चांगलंच माहीत आहे. जर या लोकांनी माझ्या आरोपाला आव्हान दिले, तर मी पुराव्यानिशी हे सिद्ध करेन, असंही बंडातात्या कराडकर म्हणाले होते.

बंडा तात्या कराडकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे आता ते अडचणीत सापडले असून, पोलिसांनी बंडा तात्या कराडकरांवर कोविडचे नियम मोडत आंदोलन करणे, बेकायदेशीर आंदोलन करणे, अशा कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे बंडातात्या कराडकर यांच्यावर कोव्हीडचे नियम मोडल्याने, गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मात्र बंडातात्या कराडकर यांच्या विधानांची दखल घेतली आहे.

महाराष्ट्रात अनेक नेत्यांची मुलं दारू पिऊन रस्त्यात पडत असतात. असं एक धक्कादायक विधान बंड्या तात्या कराडकर यांनी केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच देखील नाव घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, माध्यमांशी बोलताना बंडा तात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे दारू पिऊन रस्त्यावर पडतात असंही वादग्रस्त विधान केलं होतं.

आणि म्हणून राज्य महिला आयोगाने महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोहचलेला असल्याचे कारण देत, या प्रकरणाची दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा पोलीसांना कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. अशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वतः दिली आहे.

बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सातारा पोलीसांनी बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन 48 तासाच्या आत, या घटनेचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा. याबरोबरच बंडा तात्या कराडकर यांनी देखील दोन दिवसांच्या आत या संदर्भातला लेखी खुलासा आयोगास सादर करावा,असा देखील इशारा राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बंडा तात्या कराडकर यांना दिला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.