फलटण येथील एकजण तडीपार

0

फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील राहुल राजेंद्र जाधव रा. गोसावी गल्ली, मलटण यास १ वर्षा करीता तडीपार करण्यात आले आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी यासारखे गुन्हे करीत असलेला इसम राहुल राजेंद्र जाधव राहणार गोसावी गल्ली मलटण याचे वर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती . त्याचसोबत त्याला सुधारण्याची संधी देऊन सुध्दा त्याच्या वर्तनामध्ये काहीही सुधारणा झालेली नव्हती. त्याचा सर्वसामान्य जनतेस त्रास होत होता.

मलटण मधील जनतेकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्याकरिता वारंवार मागणी केली जात होती. त्यामुळे नमूद इसम याचे विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाणे कडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 अन्वये प्रस्ताव मा. हद्दपार प्राधिकरण तथा उपविभागीय अधिकारी फलटण विभाग फलटण यांना मा. पोलीस अधीक्षक सो.सातारा व मा. उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण विभाग फलटण यांचे मार्फत सादर करण्यात आलेला होता.

  1. त्यानुसार मा. हद्दपार प्राधिकरण कथा उपविभागीय अधिकारी फलटण यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नमूद इसम नामे राहुल राजेंद्र जाधव राहणार गोसावी गल्ली मलटण याला सातारा जिल्ह्यामधून एका वर्षाकरिता तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहेफलटण तालुक्यातील बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हॉटसअप ग्रुपला जॉईन व्हा.
  2. https://chat.whatsapp.com/IvMQvZ1V6rsCh5pcI94LUV

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.