संजय भगवान सोडमिसे पाटील यांची फलटण पंचायत समिती उपसभापतीपदी निवड

0

श्री. संजय भगवानराव सोडमिसे पाटील यांची फलटण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी वर्णी लागली आहे. संजय सोडमिसे पाटील हे सांगवी गणातून निवडून आले होते. संजय सोडमिसे यांच्या निवडीने सोमंथळीसह सांगावी गणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकनेत्याला उपसभापतीपदी काम करण्याची संधी मिळाली अशी भावना सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण झाली आहे.

2017 मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत संजय सोडमिसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेतृत्व करण्याची संधी मिळाली. संजय सोडमिसे पाटील यांना संधी मिळाल्याने सोमंथळी गावातील दोन पारंपारिक विरोधी गट म्हणजे रामभाऊ सोडमिसे आणि कै. भगवानराव सोडमिसे पाटील यांचे गट एकत्र आले. याकामी सोमंथळी गावचे बारामती स्थित उद्योजक श्री. दत्तात्रय सोडमिसे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.

संजय सोडमिसे यांना निवडून आणण्याची जबाबदरी कै. भगवानराव सोडमिसे पाटील गट, रामभाऊ सोडमिसे गट, उद्योजक दत्तात्रय सोडमिसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी उपाध्यक्ष किरण हनुमंत सोडमिसे यांच्यासह गावातील व सांगावी पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली होती.

संजय सोडमिसे हे फलटण तालुक्यातील राजकारणात चांगलेच सक्रिय असलेले पाहायला मिळतात. त्यांचे वडील कै. भगवानराव सोडमिसे यांचीदेखील फलटणसह सोमंथळीच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख होती. संजय सोडमिसे यांचे सर्वपक्षीय सबंध असल्याने त्यांना राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांनी देखील 2017 मध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना अंतर्गत मदत केल्याचे बोलले जाते.

फलटण तालुक्यातील बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

➡️https://chat.whatsapp.com/IvMQvZ1V6rsCh5pcI94LUV

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.