फलटण मध्ये मांज्यामुळे युवकाचा गळा कापल्याने ५० टाके; प्रशासनाला कधी येणार जाग

शहरातील फलटण लोणंद रोड वर असलेल्या स्मशानभूमी परिसरामध्ये आज एका तरुणाचा चिनी मांज्यामुळे गळा कपल्याची घटना घडली आहे. मांज्यामुळे पस्तीस वर्षीय तरुण हा जखमी झाल्याने प्रशासन व चिनी मांजा विक्रेत्यांचा . उमेश हरी चव्हाण (झिरपवाडी) हे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. फलटणमध्ये वारंवार अशा घटना घडून देखील कुठलेही ठोस पावले या बाबत अद्याप देखील उचलण्यात आली नाहीत.

नागरिकांमधून प्रशासन झोपले आहे का असा सवाल केला जात आहे. या अगोदर अशा घटना घडून देखील चिनी मांजा विकणाऱ्या विरोधात कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित होत आहे.

फलटण तालुक्यातील बातम्या मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/IvMQvZ1V6rsCh5pcI94LUV

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.