चेन्नईला लोळवल्यानंतर दिल्लीच्या सलामीवीरांची सोशल मीडियातही हवा

आयपीएल सीजन14 मधला दुसरा सामना काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल संघाने हा सामना एकाकी जिंकत या स्पर्धेत विजयी सलामी दिली.

चेन्नईने ठेवलेल्या १८९ धावांचे लक्ष दिल्लीने सहज पूर्ण केले. सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी चेन्नईच्या गोलंदाजाचा अक्षरशः पालापाचोळा केला. या दोघांनी १३.३ षटकात १३८ धावांची धडाकेबाज सलामी देत, दिल्ली कॅपिटल्स संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

 

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दोघांपुढे एकाही गोलंदाजाला शिरकाव लागला नाही. या दोघांच्या फटकेबाजीपुढे कॅप्टन कुल महेंद्रसिग धोनी देखील हेल्पफुल झाल्याचे दिसून आले. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी ‘पॉवर प्लेमध्ये’ तब्बल 65 धावा कुटल्या. विशेष म्हणजे या धावा करत असताना त्यांनी कोणतीही रिस्क न घेता क्रिकेटिंग शॉट्स खेळले.

धडाकेबाज फलंदाजी करत या दोघांनी काल वानखेडे मैदान गाजवलं. फक्त मैदानच नाही तर त्यांनी मैदानाबाहेर सोशल मीडियात देखील आपलाच बोलबाला असल्याचं दाखवून दिलं. शिखर धवनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पृथ्वी शॉ आणि त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याला भरभरून लाईक्स देखील मिळत आहेत.

https://www.instagram.com/reel/CNfvCt4j1P4/?igshid=3ejb61c315p9

शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघे सोशल मीडियावर अनेक फनी व्हिडिओ नेहमी पोस्ट करत असतात. काल विजयानंतर या दोघांनी एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

बेटे.. शेर हो तुम….मौज कर दी… अशा आशयाचा व्हिडिओ बनवून शिखर धवनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हीडीओमध्ये शिखर धवन ‘पृथ्वी शॉ’ला उचलून घेताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत असून याला भरभरून लाईक्स देखील मिळताना दिसून येत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.