दिल्लीत बॉम्बस्फोट
मध्य दिल्लीमधील इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्ब स्फोटाची तीव्रता ही अत्यंत कमी होती. बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा पथकांनी सर्व बाजूंनी घेराव घातला असून, यास्फोटात कोणीही जखमी झालेले नाही.
विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरती हा बॉम्ब स्फोट झाला आहे. विजय चौकवर बिटिंग रिट्रिट या सोहळयासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित आहेत.
IEDच्या स्वरुपातील ही स्फोटकं प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून पदपथावर ठेवण्यात आली होती. या स्फोटात कोणतीही जीवितहानी न झाली नाही परंतु स्फोटामुळे त्या भागात पार्क केलेल्या चार ते पाच गाडयांच्या काचा फुटल्या.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.