मांजरम ते दरेगाव रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची शेतकरी पुत्रांची मागणी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर झालेल्या कामाचे उद्घाटन २०१९ मध्ये झाले. आजपर्यंत सदरचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे गैरसोय होत आहे. गुत्तेदाराने अधिकाऱ्यांच्या संगणमताने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम अर्धवट अवस्थेत सोडून दिले आहे. वारंवार तक्रारी करूनही गुत्तेदार वेळेवर काम पूर्ण करत नसल्याची तक्रार करून याकामी गुणवत्ता व नियंत्रण विभागाकडून चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एरवी कोणत्याही कामावर जावून पाहणी करणारे आमदार या कामाकडे का दुर्लक्ष करत आहेत ? असा सवालही परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सन २०१८-१९ च्या आराखड्यात मांजरम-दरेगाव ते कोलंबी या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली. अंदाजपत्रकातील काम पूर्ण करण्याची मुदत पूर्ण होवूनही अद्याप प्रतिक कन्स्ट्रक्शन्स, नांदेड या गुत्तेदार कंपनीने सदरचे काम पूर्ण केले नाही. मनमानी पध्दतीने जेव्हा वाटेल तेंव्हा सवडीनुसार थोडे-थोडे काम हे कन्ट्रक्शन करत आहे. अंदाजपत्रकानुसार येथील काम होत नाही, मुरूम तर एकदम निकृष्ट दर्जाचा वापरत आहेत या भागात योग्य दर्जाचा मुरूम उपलब्ध असुन देखील ते कामासाठी वापरत नाहीत. कामामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगसगिरी सुरु असून कामासाठी वापरल्या गेलेल्या साहित्याच्या दर्जाची तपासणी यंत्रणेनी केली नाही. आजी-माजी लोकप्रतिनिधी व कंत्राटदाराच्या संगणमताने तर हा गैरव्यवहार करत नसतील ना अशा प्रश्न ग्रामस्थांनी केला व लेखी तक्रार कार्यकारी अभियंता साहेब (पमग्रासयो) यांच्या कडे केली.

हे काम लावलेल्या फलकानुसार 14/7/2020 मुदतीमध्ये पूर्ण‌ करण्याचे होते पण ते अजुनही, अर्धवट अवस्थेत आहे माती मिश्रित मुरुमामुळे ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांची गैरसोय झाली व गुत्तेदाराची ही मनमानी कुठेतरी थांबली पाहिजे व अत्यंत बोगस सुरु असलेल्या कामाकडे लोकप्रतिनिधी का दुर्लक्ष करत आहेत ? असा प्रश्न उपस्थित करत रस्त्याच्या कामाची चौकशी करणारे निवेदन राज्याचे ग्रामविकास मंत्री , जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अधिकारी(पमग्रासयो) यांच्यासह इतरांना देण्यात आले आहे. यावेळी शेतकरी पुत्र विश्वनाथ शिंदे, गंगाधर शिंदे,गोपाळ शिंदे, वसंत शिंदे,व्यंकट शिंदे, गजानन शिंदे व अनेक शेतकरी उपस्थित होते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.