कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानासाठी दिग्गज संघात रस्सीखेच

नवीन वर्षाची सुरुवात कसोटी क्रिकेट साठी खूपच रोमांचक असणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या संघांमध्ये कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल येण्यासाठी घौडदौड सुरू झालेली आहे. प्रत्येक संघाला अव्वल स्थानावरती येण्यासाठी संधी आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयपीएल पेक्षाही रोमांचक होईल, अशी चिन्ह दिसत आहेत.

न्यूझीलंडने पाकिस्तानवर मालिका विजय मिळविल्यास आयसीसी कसोटी क्रिकेट संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्याची संधी न्यूझीलंडला आहे, परंतु ऑस्ट्रेलिया किंवा भारत या दोघांपैकी मालिका विजय मिळवणारा संघ मात्र त्यांना मागे टाकेल.

संघांकरिता रेटिंग गुणांची मालिका-मालिकेनुसार गणना केली जाते, त्यानुसार मालिकेच्या शेवटी रेटिंग्ज अद्यतनित केली जातात. म्हणजे न्यूझीलंडकडून मालिका जिंकल्यामुळे लगेचच अव्वल स्थान गाठले जाईल, परंतु ऑस्ट्रेलिया व भारत यांच्या मालिकेसाठी, मालिका पूर्ण होईपर्यंत गुण मिळणार नाहीत.


पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामना अनिर्णयित राहिल्यास न्यूझीलंडला ११७ रेटिंग गुण मिळतील . केन विल्यमसनचा संघ २-० अशी मालिका विजय मिळवू शकला तर ते ११८ रेटिंग गुणांवर पोहचतील.

पण नंबर 1 च्या जागेवर कब्जा करणे ही किवींसाठी क्षणभंगुर क्षण ठरू शकतो.

पाकिस्तानविरुध्द न्यूझीलंडच्या निकालाची पर्वा न करता, जर भारत किंवा ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांपैकी एकाने मालिकेतील उर्वरित कसोटी सामने जिंकून, ३-१ ने मालिका विजय मिळवल्यास ते अनुक्रमे ११९ किंवा १२१ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर जातील.
टिम पेनच्या संघाला २-१ अशी मालिका जिंकणेही पुरेसे ठरेल कारण त्यांचे ११९ रेटिंग गुण होतील.

न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धची दुसरी कसोटी सामना अनिर्णीत राखला तरीसुद्धा २-१ असा निकालही भारताला पुरेसा ठरणार आहे, पण न्यूझीलंडच्या विजयामुळे कीवी एकापेक्षा कमी रेटिंग पॉईंटवर ( ११८.४ विरुद्ध ११७.७) अव्वल स्थानी येतील.


भारत – ऑस्ट्रेलिया मालिका २-२ अशी अनिर्णयात राहिल्यास व ख्रिस्तचर्च मधील सामन्यात न्युझीलंड पराभूत न झाल्यास न्युझीलंड अव्वल स्थानावर राहील..

प्रत्येक संघ अव्वल स्थानावरती येण्यासाठी आपली दावेदारी प्रबळपणे मांडताना दिसत आहे. तीनही संघातील दिग्गज खेळाडू चांगले प्रदर्शन करत आहेत, त्यामुळे ही घोडदौड आणखीनच रोमांचक होईल अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.