अ‍ॅमेझॉन कंपनीच्या वसईयेथील ऑफिसमध्ये मनसैनिकांची तोडफोड

अमेझॉन कंपनीविरुद्ध मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.अमेझॉन कंपनीचे  वसईमध्ये असणारे अ‍ॅमेझॉन ऑफिस काल संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा करून तोडफोड केली. मनसेची सुरुवातीपासूनच एक भूमिका राहिलेली आहे की  अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठी भाषेला स्थान मिळावे अशी मागणी होती.

मनसेने   अमेझॉन  कंपनीला विनंती  करूनदेखील अ‍ॅमेझॉनने या विनंतीची  काहीही दखल न घेतल्यामुळे मनसे या पक्षाने अमेझॉन कंपनीविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे.  हा वाद आता न्यायालयापर्यंत गेला आहे. या वादाप्रकरणी  राज ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती.

बजावलेली नोटीस  चुकीची आहे असे  सांगत व त्याचा राग मनात धरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉन कंपनीचा  निषेध करत वसई येथे असणाऱ्या अ‍ॅमेझॉन कंपनीचे ऑफिस फोडलेे आहे. त्याचसोबत  पुणे आणि मुंबई या ठिकाणच्या  कार्यालयांमध्येही तोडफोड करण्यात आली आहेत.

अ‍ॅमेझॉन अॅप व वेबसाईट वरती  मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने अमेझॉन ला मागणी  केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांमध्ये  मराठी भाषेमध्ये अॅप सुरू करावे नाहीतर  दिवाळी मनसेच्या स्टाईलने होईल असा  इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. याबाबत अखिल चित्रे यांनी दोन्ही  कंपन्यांच्या कार्यालयामध्ये  जाऊन त्या ठिकाणी भेट घेतली होती.   ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ अशा आशयाचे बॅनर  काही ठिकाणी झळकत होते.

विशेषबाब  म्हणजे मराठी भाषेला  प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीला अ‍ॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी हिरवा कंदील देखील दावण्यात आला होता. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत आपणास  आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.

याबाबत आम्ही आमच्या  टीमला  माहिती दिल्याबाबतचा  ई-मेल अ‍ॅमेझॉन कंपनीकडून पाठवला होता. त्याच्यानंतर अ‍ॅमेझॉनचे  शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झाले होते. मात्र त्याच्या नंतर  हे सर्व  प्रकरण कोर्टात गेल्यामुळे व राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.