बाल संरक्षण समितीच्या सदस्यपदी वनिता फाऊंडेशनचे प्रभाकर कांबळे यांची निवड.
मुंबई दि. (प्रतिनिधी ) महिला व बालविकास विभाग भारत सरकार अंतर्गत एकात्मिक बालहक्क संरक्षण योजना महाराष्ट्र सरकारने राज्यात राबविण्यासाठी केद्र शासना बरोबर करार करून ग्रामीण व नागरी भागात प्रभागानुसार /वार्ड नुसार बालसंरक्षन समितीची स्थापना केली असून विक्रोळी येथील प्रभाग क्रमांक 119 च्या नगरसेविका मनिषा रहाटे व प्रभाग क्रमांक 118 चे नगरसेवक उपेंद्र सांवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वनिता फाऊंडेशनचे संस्थापक व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांची सदस्य पदी निवड करण्यात आल्याचे विक्रोळी कांजूरमार्ग एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी हेमा काटकर व समितीच्या सचिव नंदिका काळभोर व मिनल मिंढे यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रानवये कळविले.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की विक्रोळी कांजूरमार्ग एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत जिल्हा महिला बालविकास अधिकारी चेंबूर याच्या आदेशान्वये प्रभागानुसार मुलांची काळजी आणि संरक्षण,व त्याना न्याय मिळवून देऊन .शाळा बाह्य मुलासाठी दत्तक योजना राबवून त्याच्या वर लक्ष ठेवण्यासाठी बाल संरक्षण समिती प्रत्येक वॉर्डात स्थानिक नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. त्या मध्ये सदस्य म्हणून स्थानिक डाॅकटर, शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी, सहायक पोलीस निरीक्षक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक,स्वयंसेवी स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी व12 ते 18 वयोगटातील विधाथी व विधाथीनी याचा समावेश करण्यात आला असून या समितीच्या सचिवपदी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या मुख्य सेविका नंदिका काळभोर व मिनल मिंढे असून. स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून वनिता फाऊंडेशनचे संस्थापक व सुषमा प्रतिष्ठानचे सदस्य गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे यांची ही निवड करण्यात आली असून सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.