ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; वाचा सविस्तर!

गेल्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून,आता गावपातळीवर मतदारांची मोर्चेबांधणी करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या,त्याचबरोबर नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायत अशा एकूण राज्यातील 14234 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार नुकताच जाहीर झाला आहे.

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार जाहीर झाला असून तालुक्यातील तहसीलदारांना 15 डिसेंबर 2020 ला निवडणुकांच्या कार्यक्रमाचे नोटीस प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

23 डिसेंबर 30 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांना फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली असून,अर्जाची छाननी 30 डिसेंबरला होणार आहे.

4 जानेवारी 2021ला उमेदवारांना फॉर्म मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. या एकाच दिवशी तीन वाजेपर्यंत उमेदवार आपला फॉर्म माघारी देऊ शकतात. त्याचबरोबर याच दिवशी तीन वाजल्यापासून राहिलेल्या अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटण्याचा येणार आहे. त्याचबरोबर अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

15 जानेवारी 2021 ला (आवश्यक असल्यास) मतदान होणार असून, निवडणुकीचा निकाल 18 जानेवारी 2021 रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी प्रसिद्ध केले असून, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध केलं जाणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.